महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय

मयत महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज आहे.

महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 9:14 AM

महाड : महिला सरपंचाची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच होती. महिलेवर बलात्कार किंवा अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. जंगलात रस्त्याच्या कडेला दुपारी त्यांचा मृतदेह सापडला होता.

काय आहे प्रकरण?

मयत महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज आहे.

चुलीसाठी लाकडं गोळा करायला जंगलात

सरपंच सकाळी चुलीसाठी लाकडं गोळा करायला घराबाहेर पडल्या होत्या, मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन महिला सरपंचाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. महाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महिलेवर हत्येपूर्वी बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय

मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे हत्येपूर्वी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत, किंवा तसे प्रयत्न झाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही हत्या नेमकी कोणी केली, हत्येचं कारण काय, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की अन्य कुठल्या कारणास्तव, याचा अद्याप शोध लागलेला नाही.

संबंधित बातम्या :

मद्यधुंद कार चालकाचा हैदोस, सात गाड्यांना उडवून झाडावर धडकला, पादचाऱ्यांनी चोपला

कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, उल्हासनगरच्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!