मद्यधुंद कार चालकाचा हैदोस, सात गाड्यांना उडवून झाडावर धडकला, पादचाऱ्यांनी चोपला

भरधाव कार कमानी हौदाजवळ आल्यानंतर एका झाडाला धडकली. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारमधील चालकाला बाहेर काढून स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

मद्यधुंद कार चालकाचा हैदोस, सात गाड्यांना उडवून झाडावर धडकला, पादचाऱ्यांनी चोपला
साताऱ्यात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस
संतोष नलावडे

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 28, 2021 | 8:43 AM

सातारा : मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल सात गाड्यांना धडक (Satara Car Accident) दिल्याची घटना समोर आली आहे. चार गाड्या आणि तीन दुचाकींना उडवल्यानंतर ही कार अखेर झाडावर धडकली. त्यानंतर चालकाला कारमधून बाहेर काढत पादचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

सातारा शहरातील राजपथावर सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नगरपालिका ते कमानी हौद या रस्त्यावर हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने कार भरधाव वेगात चालवत होता. यावेळी त्याने चार गाड्या आणि तीन दुचाकींना उडवले.

झाडावर आदळला, स्थानिकांनी चोपला

भरधाव कार कमानी हौदाजवळ आल्यानंतर एका झाडाला धडकली. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारमधील चालकाला बाहेर काढून स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ कार चालकास ताब्यात घेतले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सात वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

उल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत पादचारी ठार

दुसरीकडे, कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दहा दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये घडली होती. या प्रकरणी गाडी चालवणाऱ्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्राध्यापिकेला कोर्टाने जमीन मंजूर केला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील पवई चौक भागात शनिवार 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या :

सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!

उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, उल्हासनगरच्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें