UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू
प्रातिनिधिक छायाचित्र

आरोपी काका हा मागील 11 वर्षांपासून पिडीतेला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो तिला बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 27, 2021 | 10:34 PM

लखनौ : गुन्हेगारी वाढलेल्या उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी आणि नात्याला काळीमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मावशीच्या पतीने भाचीचे अपहरण करून तिला 11 वर्षे आपल्या घरी कोंडून ठेवले. त्यानंतर मागील 11 वर्षे तिची अब्रू लुटल्याची घटना घडली आहे. मावस काकाच्या अतिरेकी कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

दुर्गम भागात घडली घटना

मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गम भागात घडलेल्या या घटनेने नातेसंबंधही किती असुरक्षित बनले आहेत, याची प्रचिती आली आहे. मुरादनगरपासून काही अंतरावर असलेल्या गावात एका अल्पवयीन मुलीचे तिच्या मावस काकाने अपहरण केले. त्यानंतर 11 वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पिडीत मुलीने रविवारी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर तिच्यावरील अन्याय-अत्याचाराला वाचा फुटली आहे. पिडीत तरुणीने आरोपी काकाच्या मुसक्या आवळून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पिडीतेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या वृत्ताला स्टेशन प्रभारी सतीश कुमार यांनी दुजोरा दिला आहे. पिडीतेने सांगितले की, 11 वर्षांपूर्वी ती चारा घेण्यासाठी शेतात गेली होती, तेव्हा तिच्या मावशीने तिचे अपहरण केले होते.

अत्याचाराला विरोध केल्यास करायचा मारहाण

आरोपी काका हा मागील 11 वर्षांपासून पिडीतेला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो तिला बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे. यासाठी त्याने तिच्याशी लग्न न केल्यास चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकीही दिली आहे. तसेच लग्नाला नकार दिल्यास त्याचे आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही त्याने धमकावले. पिडीतेने आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीतरी सुटका करून घेतली आणि तेथून दिल्लीला गेली. त्यानंतर पिडीतेला तिचा खरा भाऊ दिल्लीत सापडला. भावाने बहिणीला ओळखले. यानंतर मुलीने तिचा मावस काकाकडून झालेला प्रचंड त्रास कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतरच ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली. (In Uttar Pradesh, a girl was abducted and raped for 11 years)

इतर बातम्या

Yavatmal Crime: चाकूनेच केला तीन वर्षीय चिमुकलीचा घात, यवतमाळमधील आर्णीतील अमानवीय कृत्याने यवतमाळ हादरले

Ambernath : अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, तर मुख्य आरोपी फरार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें