Dowry | सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल संचालकावर गुन्हा, बायकोकडे 25 लाखांचा तगादा?

सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल अजिंक्यचे संचालक धनंजय ठेंगील अडचणीत येण्याची शक्यता आहे. हुंड्यासाठी त्यांनी पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे.

Dowry | सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल संचालकावर गुन्हा, बायकोकडे 25 लाखांचा तगादा?
आरोपी हॉटेल संचालक
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 10:32 AM

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध हॉटेल संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी (Dowry) पत्नीचा छळ केल्याचा संचालकावर आरोप आहे. हॉटेल अजिंक्यचे संचालक धनंजय ठेंगील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्यवसायासाठी माहेरुन 25 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पतीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तगदा लावल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. त्याचबरोबर पती धनंजय ठेंगील याने दुसरं लग्न केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल अजिंक्यचे संचालक धनंजय ठेंगील अडचणीत येण्याची शक्यता आहे. हुंड्यासाठी त्यांनी पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे.

पीडितेचा आरोप काय?

व्यवसायासाठी माहेरुन 25 लाख रुपये आणावेत, यासाठी धनंजय ठेंगील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तगदा लावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्याचबरोबर धनंजय ठेंगील यांनी दुसरा विवाह केल्याचा दावाही विवाहितेने केला आहे.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भादवि 498-अ, 494, 323, 506 आणि 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

 पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून परिचारिकेने उचलेले टोकाचे पाऊल

‘…तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज’, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले?

20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सुनेची हत्या?; पोलीस अधिकाऱ्याला मुलासह अटक