सोलापुरात विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या, विहिरीत तिघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

आत्महत्या केलेली महिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ गावची रहिवासी आहे. सोनाली चोपडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत आयुष्याची अखेर केल्याचा आरोप आहे.

सोलापुरात विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या, विहिरीत तिघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
सोलापुरात महिलेची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 11:11 AM

सोलापूर : विवाहित महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचा मृतदेह विहिरीत (Married Lady Found Dead) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यात (Solapur Crime News) दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारातील एका विहिरीत तिघे जण मृतावस्थेत आढळले. महिलेने दोन्ही लेकरांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या (Suicide) केली असावी, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र महिलेने खरंच जीव दिला, की तिघं अपघाताने विहिरीत पडले, की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

आत्महत्या केलेली महिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ गावची रहिवासी आहे. सोनाली चोपडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत आयुष्याची अखेर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची माहिती सुरेश चोरमले याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे दयानंद शिंदे याची शेती आहे. या शेतात तिल्हेहाळ येथील विवाहित महिला सोनाली चोपडे हिने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.