Vaishnavi Hagvane death : भय इथले संपत नाही ! 1-2 नव्हे दीड वर्षांत तब्बल 30 वैष्णवींनी संपवलं आयुष्य

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दीड वर्षात 30 महिलांनी हुंडाबळी आणि कौटुंबिक छळामुळे आत्महत्या केल्या आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरण याची एक झलक आहे. या घटनांमध्ये मानसिक छळ, हुंड्याची मागणी, आणि पतीचे व्यसनाधीन वर्तन ही मुख्य कारणे आहेत.

Vaishnavi Hagvane death : भय इथले संपत नाही ! 1-2 नव्हे दीड वर्षांत तब्बल 30 वैष्णवींनी संपवलं आयुष्य
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 28, 2025 | 11:08 AM

51 तोळं सोन, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडील लग्नात लाखोंचा खर्च करूनही गहवणे कुटुंबांची हाव सरली नाही आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या सुनेला, वैष्णवीला छळ करू, तिचे हाल करून मृत्यू कवटाळण्यास भाग पाडलं. पुण्यातील मुळशी जवळच्या गावातील विवाहीत महिला वैष्वणी हगवणे मृत्यूप्रकरण संपूर्ण राज्य हादरलं असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत तिचा पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मात्र सासरच्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपवलयाची ही काही एकच घटना नाही. राज्यात काय देशातही महिलांच्या छळाच्या, हुंड्यापायी जीव घेतल्याच्या्नेक घटना घडल्या असून याच पारअश्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याची ही घटना ताजी असतानाचत पिंपरी-चिंचवडीमधील एक धक्कादायक आकडेवारी देखील समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत ३० वैष्णवींनी जीवन संपवल्याचे उघड झाले आहे.

30 वैष्णवींनी उचललं टोकाचं पाऊल

दीड वर्षाच्या कालावधीत 1-2 नव्हे वैष्णवीसारख्या तब्बल 30 महिला, मुली, तरूणींनी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. तर पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल केले. राजेंद्र हगवणे यांची सून असलेल्या वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असताना, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दीड वर्षांत ३० विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच कालावधीत पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप करत पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी 2024 ते में 2025 या कालावधीत या घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिली आहेत

आत्महत्येची कारणं काय ?

या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांवर मातृत्वाचा दबाव, मूल नसल्यामुळे होणारा ताण, सतत अपमान करणं, आणि पतीच्या परस्त्री संबंधांमुळे त्रास, ही कारणं आत्महत्येस कारणीभूत ठरली आहेत.

Vaishnavi Hagavane Death : सुनाही इतिहास घडवू शकतात.. वैष्णवीच्या दिराच्या ‘त्या’ पोस्टमुळे नेटकऱ्यांचा संताप, ‘खायचे दात वेगळे… म्हणत झोड झोड झोडलं !

हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी आज संपणार

दरम्यान वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे कुटुंबियांचे पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत जामीन मंजूर केला आहे.

हगवणे यांना आश्रय दिल्या प्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्यासह मोहन उर्फ बंडू भेगडे बंडू फाटक अमोल जाधव आणि राहुल जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत जामीन मंजूर केला.

निलेश चव्हाण अजूनही फरार

दरम्यान या प्रकरणात वैष्णवीच्या आई-वडीलांना, कस्पटे कुटुंबीयांना धमकावणारा बंदूकबाज निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. तर राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला गाडी देणारा थारचा मालक संकेत चोंधे याच्यावरही त्याच्या वहिनीने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.