AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagavane Death : सुनाही इतिहास घडवू शकतात.. वैष्णवीच्या दिराच्या ‘त्या’ पोस्टमुळे नेटकऱ्यांचा संताप, ‘खायचे दात वेगळे… म्हणत झोड झोड झोडलं !

वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या सासरच्या लोकांना अटक झाली आहे. शवविच्छेदन अहवालात मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. वैष्णवीच्या दीराची जुनी सोशल मीडिया पोस्ट आता व्हायरल झाली असून त्यात सुनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे, पण त्यांच्या घरात सुनांनाच छळण्यात आले. या विरोधाभासी स्थितीमुळे मोठा संताप निर्माण झाला असून नेटकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे.

Vaishnavi Hagavane Death : सुनाही इतिहास घडवू शकतात.. वैष्णवीच्या दिराच्या 'त्या' पोस्टमुळे नेटकऱ्यांचा संताप, 'खायचे दात वेगळे... म्हणत झोड झोड झोडलं !
सुशील हगवणेची जुनी पोस्ट चर्चेतImage Credit source: social media
| Updated on: May 27, 2025 | 10:46 AM
Share

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. तिने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. परंतु शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा मिळाल्या आहेत. सासरच्या लोकांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सांगत तिची हत्या झाल्याचा आरोप आई-वडिलांनी केला असून याप्रकरणी आत्तापर्यंत वैष्णवीचा नवरा, नणंद, सासू, सासरे आणि दीर अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना लगेचच अटक केली होती. मात्र तिचा दीर सुशील आणि सासरा राजेंद्र हगवणे हे फरार होते. गेल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली. फरार असतात त्यांना मदत करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून काल त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान वैष्णवी हगवणेचा दीर सुशील याची सोशल मीडियावरील एक जुनी पोस्ट आता पुन्हा व्हायरल झाली असून चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी एक पोस्टमध्ये सुशील हगवणेने लेक आणि सुनांबद्दल लिहीलं होतं, तीच पोस्ट आता पुन्हा चर्चेत आली असून त्यावर लोकांनी संताप व्यक्त करत त्याला बरंच सुनावलं देखील आहे.

काय आहे सुशील हगवणेची पोस्ट ?

राजेंद्र हगवणे तसेच सुशील हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत होते. राष्ट्रवादीत काम करत असताना गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांदरम्यान सुशीलने एक पोस्ट करत निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि . सुनेत्रा पवार अशी लढत होती, त्याचदरम्यान सुशील हगवणेने सुनेत्रा पवारा्चा प्रचार केला. त्यासाठी त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इन्स्टाग्रामच्या त्याच्या अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. ‘ यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सूनेसाठी ‘ असं सुशीलने त्याच्या पोस्टमध्ये लिहीलं होतं.

संताप व्यक्त करत नेटकऱ्यांनी सुशीलला सुनावलं

सुनेला मदतान करावं असं आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेच्या घरात मात्र त्यांच्या दोन्ही सुनांना ( मयुरी जगताप – वैष्णवी हगवणे) अगदी कस्पटासमान वागमूक देऊन छळ करण्यात आला, मारहाणही झाली. त्रास असह्य होऊन एकीने (मयुरी) घरं सोडलं तर दुसरीचा (वैष्णवी) मृत्यूच झाला. त्यामुळे लोकांना सुनेसाठी मत द्यायला सांगणाऱ्या हगवणेंच्या घरातला हा विरोधाभास समोर आला असून वर्षभरापूर्वीची ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली असून त्यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे , लोका सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे पाषाण असे म्हणत हगवणे कुटुंबावर नेटकऱ्यांनी यथेच्छ टीका करत त्यांना चांगलंच सुनावलं आहे, अशा अनेक कमेंट्स या पोस्टखाली दिसत आहेत.

सुशील हगवणेची ती पोस्ट 3 मे 2024 ची म्हणजे वर्षभरापूर्वीची आहे, मात्र गेल्या आठवड्यात त्यांच्याच घरातील सुनेचा, वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून किंवा अगदी काही तासांपूर्वीदेखील लोकांनी या पोस्टवर कमेंट्स करत हगवणे कुटुंबाला सुनावलं आहे. या पोस्टमध्ये सुशील हगवणे हा सुनेत्रा पवार तसेच रुपाली ठोंबरे यांच्यासोबत दिसतोय, त्यामुळे नेटकऱ्यांनी राजकारण्यांवरही टीकास्त्र सोडलंय. निर्लज्ज राजकारणी, राजकारणात मानस किती खोटं बोलतात बघा, काल न्यूज चॅनेलच्या चर्चेदरम्यान तुम्ही म्हणाला होतात की मला माहीत नव्हतं ते आमच्या पक्षात आहेत ते, मग हे काय आहे? असं म्हणत एका युजरने तर रुपाली ठोंबरेना टॅग करत त्यांनाच सवाल विचारला आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.