AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरी करायला आला, पण महिलेचा किस घेऊन पळाला… मुंबईत चोराचा कारनामा !

या घटनेमुळे ती महिला हादरली होती, मात्र चोर पळून गेल्यानंतर तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सगळा प्रकार कथन केला.ही अजब घटना ऐकून पोलसिसही क्षणभर अवाक् झाले.

चोरी करायला आला, पण महिलेचा किस घेऊन पळाला... मुंबईत चोराचा कारनामा !
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 08, 2025 | 9:06 AM
Share

मुंबईतील मालाडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला काहीच मौल्यवान वस्तू मिळाली नाही, म्हणून त्याने जे केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. घरात काहीच मौल्यवान गोष्टी न सापडल्याने चोरटा घरातून तर निघून गेला, पण त्याआधी त्याने घरात असलेल्या महिलेला किस (Kiss) केलं आणि मगच घरातून पळ काढला. यामुळे हादरलेल्या महिलेने यासंदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही अजब घटना ऐकताच पोलिसही अवाक् झाले पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास करत त्या भुरट्या चोराला बेड्या ठोकून अटक केली. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

चोर घरात घुसला आणि ..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही अजब घटना घडली. याबाबत कुरार पोलिसांनी माहिती दिली. एका महिलेचा विनयभंग आणि घरात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मालाडमध्ये राहणाऱ्या 38 वर्षांच्या महिलेने तक्रार नोंदवली होती.

घटना घडली तेव्हा महिला घरात एकटीच होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्या महिलेने आरडाओरडा करू नये म्हणून चोरट्याने तिचं तोंड दाबून ठेवलं. आणि तिला धमकावत, घरातील सर्व मौल्यवान वस्तू, मोबाई, एटीएम कार्ड आणि पैसे कुठे आहेत, ते विचारत मुद्देमाल देण्यास सांगितलं. पण घरात काहीच मौल्यवान नसल्याचे त्या महिलेने आरोपीला सांगितलं. तेव्हा चोराने घराची काहीच तपासणी केली नाही, पण त्याने त्या महिलेला किस केलं आणि तो फरार झाला, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे ती महिला हादरली होती, मात्र चोर पळून गेल्यानंतर तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सगळा प्रकार कथन केला.ही अजब घटना ऐकून पोलसिसही क्षणभर अवाक् झाले, पण त्यांनी लागलीच गुन्हा दाखल करत त्या आरोपूचा सोध सुरू केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा यापूर्वी गुन्ह्यांचा कोणताही रेकॉर्ड नाही. तो कुटुंबासोबत राहतो, पण सध्या बेरोजगार आहे. पोलिसांनी त्याचा शोध लावत त्याला बेड्या ठोकून अटक केली.

Follow Us
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?