Pune Crime : भयानक ! ऊसाचा रस पाजून अल्पवयीन मुलाला भुलवलं, अनैसर्गिक अत्याचार आणि..

पुण्यातील गुन्ह्याच्या वाढत्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. सतत कोणत्या, ना कोणत्या गुन्ह्यांच्या घटना समोर येतच असतात. आता पिंपरी-चिंचवडमध्येही एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथे एका अवघ्या आठ वर्षांच्या निरागस मुलाचे अपहरण करून ..

Pune Crime :   भयानक ! ऊसाचा रस पाजून अल्पवयीन मुलाला भुलवलं, अनैसर्गिक अत्याचार आणि..
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 4:01 PM

पिंपरी चिंचवड | 27 फेब्रुवारी 2024 : पुण्यातील गुन्ह्याच्या वाढत्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. सतत कोणत्या, ना कोणत्या गुन्ह्यांच्या घटना समोर येतच असतात. आता पिंपरी-चिंचवडमध्येही एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथे एका अवघ्या आठ वर्षांच्या निरागस मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचा क्रूरपणा एवढ्यावरच मर्यादित नाही, तर त्या मुलाला संपवण्याआधी त्याने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले, असेही उघड झाले आहे. त्यानंतर त्याला मारहाण करत गळा दाबून त्याचा खून करून मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन जोगेश्वरप्रसाद पांडे याला अटक केली असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार वाकड येथे ही घटना घडली. अवघ्या आठ वर्षीय या मुलाचे वाकड येथे राहत्या घराजवळून अपहरण झाले. त्याला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. त्याच्या आधारे मुलाला घेऊन जाणाऱ्या तरुणाची ओळख पटवून पोलिसांनी त्याला बावधन येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा आरोपी पांडे हा मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने आधी उडवाउडवीची उत्तरं दिली.

ऊसाच्या रसाचे आमिष दाखवून भुलवले

त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केल्यावर आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. शनिवारी रात्री त्याने त्या मुलाचं अपहरण करून हे गैरकृत्य केलं आणि त्याची हत्या केल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पवन हा मूळचा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. दीड महिन्यापूर्वी तो कामाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात आला होता, वाकड येथे त्याला एका रसवंतीगृहामध्ये तो काम करत होता. पवन हा त्या मुलाला दररोज उसाचा रस प्यायला देत असेल, त्यामुळेच त्या दोघांची गट्टी जमली. त्याचाच गैरफायदा घेत त्याने हे भयानक कृत्य केलं.

घटनेच्या दिवशी पीडित मुलगा त्याच्या घराजवळच खेळत होता, मात्र तो अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ शोधाशोध करूनही तो न सापडल्याने अखेर त्याच्या वडिलांनी वाकड पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोधार्थ तपास सुरू केला. बेपत्ता होण्यापूर्वी तो मुलगा आरोपी पवन याच्यासोबत फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्याआधारे पोलिसांनी पवन याला त्याच्या बावधनधूल घरातून ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केली. आणि नंतर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वरप्रसाद पांडे ह्या आरोपी विरोधात भादवी 302 आणि 377 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. आरोपीच्या कबुलीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.