Mumbai Crime : लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला जाळणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

आरोपी हा परिसरातील महिलांची छेड काढायचा, त्यांना उद्देशून गलिच्छ शब्द उच्चारत अश्लील शेरेबाजीदेखील करायचा. या विरोधात पीडि महिलेने आवाज उठवला होता. त्याच रागातून सूड उगवण्यासाठी आरोपीने हे निर्घृण कृत्य केले.

Mumbai Crime : लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला जाळणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा
court
| Updated on: Nov 09, 2023 | 11:58 AM

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढतच होते. प्रवासही महिलांसाठी फारसा सुरक्षित राहिला नाही. त्यांना उद्देशून शेरेबाजी करणे, गैरवर्तन करणे असे एक ना अनेक प्रकार घडत असतात. बऱ्याच महिला हा अन्याय सहन करतात, पण फारच थोड्या असतात ज्या या अन्यायाविरोधात आवाज उठवतात. पण काही वेळेस त्यांना त्याचीही शिक्षा भोगावी लागते.

अशाच एका नराधमाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेचा आवाज कायमचा बंद करण्यात आला होता. आजूबाजूच्या परिसरातील महिलांची छेड काढणाऱ्या, त्यांना उद्देशून अश्लील शेरेजबाजी करणाऱ्या इसमाला रोखले. त्याच्याविरोधात आवाज उठवला हे एका महिलेला महागात पडले. त्या महिलेचा सूड घेण्यासाठी त्या नराधमाने तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण अखेर याप्रकरणी न्याय झालाच. त्या महिलेच्या हत्येप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दीपक जाट असे आरोपीचे नाव असून मुंबई सत्र न्यायालयाने त्याला ही शिक्षा ठोठावली.

काय आहे प्रकरण ?

14 एप्रिल 2017 साली मुंबईतील वांद्रे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अमरावती हरिजन नावाच्या महिलेवर रॉकेल टाकून तिला जाळल्याचा आरोप दीपक जाट याच्यावर होता. दीपक हा त्या परिसरातील महिलांची छेड काढायचा, त्यांना उद्देशून गलिच्छ शब्द उच्चारत अश्लील शेरेबाजीदेखील करायचा. अमरावती या महिलेने हा प्रकार पाहिला आणि तिने दीपकला रोखण्याचा प्रयत्न केला.

एवढेच नव्हे तर या मुद्यावरून तिने दीपकला एकदा भररस्त्यात झोडपलेही होती. याचा प्रचंड राग आल्याने संतापलेल्या दीपकने तिच्यावर सूड उगवण्याचा निश्चय केला. त्याच रागातून 14 एप्रिल 2017 साली अमरावती आणि तिच्या शेजारच्या मुलीवर पेट्रोल चाकून जिवंत जाळले. या घटनेत अमरावती ही तब्बल 95 टक्के भाजली. तर तिच्या शेजारी उभी असलेली महिला आणि तिची अडीच वर्षीय मुलगी देखील होरपळली. उपचारांदरम्यान अमरावती हिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक याला अटक करून त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला. अखेर सत्र न्यायालयाने त्याला हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.