दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

| Updated on: Aug 21, 2021 | 3:03 PM

झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची आणि मुलीची निघृण हत्या केली आहे.

दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

रांची : झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची आणि मुलीची निघृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. आरोपी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे.

मित्रासोबत मिळून हत्या

संबंधित घटना ही पाकुड जिल्ह्यातील लिट्टीपाडा पोलीस ठाणे हद्दीतील गाडूपहाडी गावात घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या चिमुकलीला देखील सोडलं नाही. त्यांनी आईसोबत मुलीची देखील चाकून भोसकून हत्या केली. या मायलेकीला मारणाऱ्या नराधमाचं नाव गंगाराम तुरी असं आहे. त्याने मित्र पवन कुमार साहा याच्यासोबत मिळून पत्नीची हत्या केली.

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद

मृतक महिलेचं नाव रानी तुरी असं होतं. गंगाराम तुरी याचं रानी हिच्याशीसोबत दुसरं लग्न झालं होतं. दोघांना एक लहान मुलगी होती. पण ती मुलगी आपली नसल्याचा दावा गंगाराम करायचा. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे तो पत्नीला वारंवार शिवीगाळ करायचा. यावरुन दोघांमध्ये सारखा वाद सुरु असायचा.

आरोपीने कट आखत हत्या केली

गंगारामने आपला मित्र पवन याच्यासोबत मिळून पत्नीची हत्या करण्याचा कट आखला. त्याने दवाखान्यात नेण्याचं कारण सांगून पत्नीला घराबाहेर नेलं. यादरम्यान वाटेत आरोपींनी पत्नी आणि लहान मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले. हत्येनंतर काही स्थानिकांना महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह मिळाला. पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास केला. त्यानंतर मृतक महिलेची ओळख पटली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या. यावेळी पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.

हेही वाचा : 

2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी

रांजणगाव MIDCमध्ये गुन्हेगारी वाढली; खंडणी वसूल करणाऱ्या कामगार नेत्याला अटक, गुन्हेगारांना रोखण्याचं पोलिासंपुढे अव्हान