फॅक्टरीत नोकरी, पगारही बरा, तरी त्याने चोरले 5 डीप फ्रीजर, कारण काय तर..

ही अजबगजब घटना संजय नगर पोलीस ठाणे बारादरी परिसरातील आहे. सौरभ ग्वाल नावाचा 32 वर्षीय तरुण तेथील एका आईस्क्रीम कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अचानक...

फॅक्टरीत नोकरी, पगारही बरा, तरी त्याने चोरले 5 डीप फ्रीजर, कारण काय तर..
त्याने चोरले 5 डीप फ्रीजर, कारण...
| Updated on: Apr 07, 2025 | 10:20 AM

युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं… असं म्हणतात, तुम्हीदेखील हे कधी ना कधी ऐकल असेलंच. पण गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी एखादा बॉयफ्रेंड चक्क चोर बनल्याचे, तुम्ही कधी ऐकलंत का ? अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात. पण उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका प्रियकराने कारखान्यात चोरी केली, जिथे तो स्वतः काम करतो. प्रियकराने कारखान्यातून पाच डीप फ्रीझर चोरले. त्याची डीलही फायनल झाला होता, पण फ्रीझर विकण्यापूर्वीच तो पकडला गेला. आणि हे सगळं का केलं, तर एका मुलीसाठी…

ही अजबगजब घटना संजय नगर पोलीस ठाणे बारादरी परिसरातील आहे. सौरभ ग्वाल नावाचा 32 वर्षीय तरुण तेथील एका आईस्क्रीम कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कारखान्यात मोठ्या प्रमाणात नवीन डीप फ्रीझर एक्स्ट्रा म्हणून ठेवण्यात आले होते. प्रेयसीला तिच्या वाढदिवशी महागडे गिफ्ट देण्यासाठी सौरभला पैशांची गरज होती, पण चांगल गिफ्ट खरेदी करण्यासाठी त्याचा पगार पुरेसा नव्हता. त्यामुळे त्याने एक भयानक प्लान रचला आणइ स्टॉकमध्ये ठेवलेल्या 21 मोठ्या डीप फ्रीझरपैकी पाच डीप फ्रीझर चोरून दोन दिवसांपूर्वी रात्री वाहनात विक्रीसाठी पाठवले.

फॅक्टरी मालकाने पोलिसांना कळवलं आणि…

त्यानंतर मालक अचानक कारखान्यात पोहोचला आणि त्याने तेथे असलेला साठा तपासला असता 21 पैकी 5 फ्रीझर गायब होते. मालकाने सौरभकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर मालकाने बारादरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी संशयाच्या आधारे सौरभची कडक चौकशी केली असता तो कोसळला आणि गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी पटापट सूत्र हलवली आणि विकले जाण्यापूर्वीच पाचही डीप फ्रीझर जप्त केले.

48 तासांत पकडला आरोपी

चोरीच्याघटनेच्या 48 तासांत पोलिसांनी हा शोध लावत आरोपीलाही पकडलं. पोलिसांची थोडीशीही चूक झाली असती तर सौरभला त्याच्या योजनेत यश आले असते आणि त्याने फ्रीजरचे स्टिकर्स बदलून विकले असते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे सौरभचा डाव फसला. गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्याची त्याची इच्छा तर पूर्ण झालीच नाही, वरतून त्याला जेलचीही हवा खावी लागली.