काय चाललंय काय ? गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवलं… अल्पवयीन मुलाने मित्रालाच संपवलं
गुजरातमधील बडोदा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्याच्या मागचं कारण तर आणखीनच धक्कादायक आहे. गर्लफ्रेंड नाही म्हणून मित्राने चिडवल्याचा राग आला आणि त्याच रागातून त्या मुलाने मित्राला संपवलं

गुजरातमधील बडोदा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्याच्या मागचं कारण तर आणखीनच धक्कादायक आहे. गर्लफ्रेंड नाही म्हणून मित्राने चिडवल्याचा राग आला आणि त्याच रागातून त्या मुलाने मित्राला संपवलं. त्याने त्या मित्राला भेटायला बोलावलं आणि आपल्या साथीदारासह त्याला संपवंल. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्यातील दिवाळीपुरा भागात एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. या अल्पवयीन मुलाने दिशांत राजपूत नावाच्या मित्राला दिवाळीपुरा भागात फिरायला बोलावले. तेव्हा हल्लेखोराने त्याच्या मित्रालाही सोबत आणले होते. चौघेही कोर्ट कॉम्प्लेक्सजवळील एका कॉलनीत गेले. तेथे आरोपींनी चाकू काढून दिशांतवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
नुकतीच दिली होती 12वीची परीक्षा
दिशांतवर चाकूने वार करून हत्या केल्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले. दोन्ही आरोपींनी नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती. ते मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत. हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मृत मुलगा दिशांत राजपूतचे मित्रमंडळ बरंच मोठं होतं, त्यामध्ये मैत्रिणींचाही समावेश होता. दिशांत आणि त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी मुलगा हे दोघे एकत्र ट्यूशनला जायचे. मात्र तिथे दिशांत हा आरोपीला गर्लफ्रेंड नसल्याबद्दल खूप चिडवायचा.
गर्लफ्रेंड नसल्यावरून चिडवल्याचा आला राग
दिशांत हा त्याला सारखा चिडवायचा. मात्र मैत्रीण नसल्यामुळे दिशांतचं चिडवणं हे आरोपीला सहन झालं नाही. त्याचा त्याला प्रचंड राग आला. त्याच रागातून आरोपीने त्याच्या मित्रासह दिशांतला धडा शिकविण्यासाठी मारण्याचा कट रचला. त्यानंतर दिशांतला बोलावून त्याच्या छातीत चाकू खुपसला आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठवले आहे.