AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Road Murder : अखेर पोलिसांनी त्यांना शोधलंच, मृत सरस्वतीच्या बहिणी पोचल्या पोलिस स्टेशनमध्ये, रडून अवस्था झाली वाईट

मृत महिला सरस्वती हिची बहीण व नातेवाईक पोलिस स्थानकांत पोहोचले आहेत.

Mira Road Murder : अखेर पोलिसांनी त्यांना शोधलंच, मृत सरस्वतीच्या बहिणी पोचल्या पोलिस स्टेशनमध्ये, रडून अवस्था झाली वाईट
| Updated on: Jun 09, 2023 | 2:07 PM
Share

मुंबई : मीरा रोड येथील हत्याकाडांत (mira road crime) रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या केसमधील नवे अपडेट (updates in case) समोर आले आहे. मृत महिला सरस्वतती वैद्य हिच्या कुटुंबियांना पोलिसांनी शोधून काढलं आहे. तिची बहीण व नातेवाईक नया नगर पोलिस स्थानकांत पोहोचले असून रडून-रडून त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. बहिणीच्या मृत्यूमुळे त्यांना धक्का बसला आहे. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, त्या नीट जबाबही नीट नोंदवू शकत नाहीयेत.

सरस्वती हिचे कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती आत्तापर्यंत समोर येत होती. पण आता तिची बहीण व नातेवाईक समोर आले आहेत. पोलिस स्थानकांत येऊन त्या जबाब नोंदवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सरस्वतीच्या बहिणींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांच्या बहिणीसोबत कोणी असं कृत्य करू शकतं, यावर त्यांचा विश्वासत बसत नाहीये. बहिणीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लिव्ह-इन पार्टनरनेच क्रूरपणे केली हत्या

मीरा रोड येथील हत्याकांडाने सर्वच हादरून गेले आहेत. मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्यची क्रूर हत्या केली. मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुत्र्याला खायला घातले. घरातील दुर्गंधीमुळे या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. त्याला कोर्टात हजर केले. त्याला पोलीस कोठडीही सुनावली गेली.

संपूर्ण घरात मृतदेहाचे तुकडेच तुकडे

सरस्वतीने आत्महत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने तुकडे केले. छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्याने त्यातील काही तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले. नंतर गॅसवर ते भाजले. हे तुकडे सहज फेकता यावेत म्हणून त्याने हे कृत्य केलं. त्याने हे तुकडे बादली, टब, कुकर आणि किचनमधील भांड्यात ठेवले होते. त्याने सरस्वतीच्या देहाचे इतके तुकडे केले की पोलीस त्याची गिनतीही करू शकत नव्हते, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून आज दिवसभर त्याची चौकशी केली जाणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा