Mira Road Murder : अखेर पोलिसांनी त्यांना शोधलंच, मृत सरस्वतीच्या बहिणी पोचल्या पोलिस स्टेशनमध्ये, रडून अवस्था झाली वाईट

| Updated on: Jun 09, 2023 | 2:07 PM

मृत महिला सरस्वती हिची बहीण व नातेवाईक पोलिस स्थानकांत पोहोचले आहेत.

Mira Road Murder : अखेर पोलिसांनी त्यांना शोधलंच, मृत सरस्वतीच्या बहिणी पोचल्या पोलिस स्टेशनमध्ये, रडून अवस्था झाली वाईट
Follow us on

मुंबई : मीरा रोड येथील हत्याकाडांत (mira road crime) रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या केसमधील नवे अपडेट (updates in case) समोर आले आहे. मृत महिला सरस्वतती वैद्य हिच्या कुटुंबियांना पोलिसांनी शोधून काढलं आहे. तिची बहीण व नातेवाईक नया नगर पोलिस स्थानकांत पोहोचले असून रडून-रडून त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. बहिणीच्या मृत्यूमुळे त्यांना धक्का बसला आहे. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, त्या नीट जबाबही नीट नोंदवू शकत नाहीयेत.

सरस्वती हिचे कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती आत्तापर्यंत समोर येत होती. पण आता तिची बहीण व नातेवाईक समोर आले आहेत. पोलिस स्थानकांत येऊन त्या जबाब नोंदवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सरस्वतीच्या बहिणींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांच्या बहिणीसोबत कोणी असं कृत्य करू शकतं, यावर त्यांचा विश्वासत बसत नाहीये. बहिणीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लिव्ह-इन पार्टनरनेच क्रूरपणे केली हत्या

हे सुद्धा वाचा

मीरा रोड येथील हत्याकांडाने सर्वच हादरून गेले आहेत. मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्यची क्रूर हत्या केली.
मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुत्र्याला खायला घातले. घरातील दुर्गंधीमुळे या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. त्याला कोर्टात हजर केले. त्याला पोलीस कोठडीही सुनावली गेली.

संपूर्ण घरात मृतदेहाचे तुकडेच तुकडे

सरस्वतीने आत्महत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने तुकडे केले. छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्याने त्यातील काही तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले. नंतर गॅसवर ते भाजले. हे तुकडे सहज फेकता यावेत म्हणून त्याने हे कृत्य केलं. त्याने हे तुकडे बादली, टब, कुकर आणि किचनमधील भांड्यात ठेवले होते. त्याने सरस्वतीच्या देहाचे इतके तुकडे केले की पोलीस त्याची गिनतीही करू शकत नव्हते, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून आज दिवसभर त्याची चौकशी केली जाणार आहे.