बोर्डाची परीक्षा देणाऱ्यांना कसलं टेंशन; अर्धे लक्ष पेपरमध्ये आणि अर्धे लक्ष बाहेर ? काय घडलं परीक्षा केंद्राच्या बाहेर?

| Updated on: Mar 06, 2023 | 7:32 PM

आठ दिवसांत दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात सारखीच घटना घडल्याने नाशिक शहरासह शालेय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

बोर्डाची परीक्षा देणाऱ्यांना कसलं टेंशन; अर्धे लक्ष पेपरमध्ये आणि अर्धे लक्ष बाहेर ? काय घडलं परीक्षा केंद्राच्या बाहेर?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : सध्या राज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ( Board Exam ) सुरू आहे. त्यामध्ये परीक्षा मंडळाकडून विशेष सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार ईलेक्ट्रॉनिक वस्तूं सोबत बाळगण्यास मनाई आहे. त्यामध्ये विशेषतः मोबाइलला बंदी आहे. मात्र, अलिकडच्या काळात मोबाइल ( Mobile theft ) हा जीवनातील एक प्रकारचा अविभाज्य घटकच बनला आहे. त्यामुळे मोबाईल अलीकडे शालेय विद्यार्थ्यांकडे बंदी असतांनाही शाळेत आढळून येत असतो. परंतु सध्या परीक्षा असल्याने परीक्षा संपल्यावर पालकांशी संपर्क करण्यासाठी किंवा इतरांशी तात्काळ संपर्क करण्यासाठी अनेक विद्यार्थी मोबाईल सोबत बाळगत आहे. त्यात परीक्षा केंद्रात तपासणी करून पाठवत असल्याने दुचाकीच्या डिक्कीत किंवा बाहेर बॅगमध्ये ठेवला जात आहेत. आणि हीच संधी चोरांसाठी उपलब्ध झाली आहे.

नाशिकच्या नाशिकरोड येथील परीक्षा केंद्राच्या बाहेर सहा ते सात मोबाइल चोरीला गेल्याची घटना मागील आठवडयात घडली होती. त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू असला तरी याबाबत विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी आहे. त्यामुळे मोबाइल चोरीचे प्रकरण विद्यार्थ्याना महागात पडले होते.

उपनगर पोलिस ठाण्याचा पोलिसांकडून याबाबत तपास करण्यात आला मात्र अद्याप त्याबाबत विद्यार्थ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नसतांना शहरातील महाविद्यालयाच्या पार्किंग मधील दुचाकीमधून मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

एका नामांकित महाविद्यालयात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यानुसार अनेक विद्यार्थी मोबाईल परीक्षा केंद्रात घेऊन जाण्याऐवजी गाडीच्या डिक्कीत ठेवत आहे. आणि त्यानंतर परीक्षेला जात आहे. मात्र, पार्किंग मध्ये कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी प्रवेश करत मोबाइल चोरी केले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन बाहेर आल्यानंतर डिक्कीत मोबाइल नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये सहा महागडे मोबाईल चोरीला गेले आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीची ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान उभे राहिले असून पोलिसांना याबाबत यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरेल. मात्र दुसरीकडे या प्रकारामुळे शालेय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.