Video Viral : महिला गयावया करीत होती, तिला कारच्या बोनेटवरून रस्त्यावर फिरविले, तीन पोलीस सस्पेंड

तस्करी प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती, त्या तरुणाची आई पोलिसांना तिच्या मुलाला सोडवा अशी विनवणी करीत होती, परंतू तिला पोलीसांनी कारच्या बोनेटवरुन फिरविले

Video Viral : महिला गयावया करीत होती, तिला कारच्या बोनेटवरून रस्त्यावर फिरविले, तीन पोलीस सस्पेंड
car bonnet
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 06, 2023 | 12:36 PM

भोपाळ : पोलीसांनी एका महिलेला कारच्या बोनेटवरुन ( Car’s Bonnet ) पाचशे मीटर फरफरट नेल्याचा व्हिडीओ व्हायरल ( Video Viral )  झाला आहे. या महिलेचा दोष इतकाच होता की तिच्या मुलाला सोडविण्याची विनवणी ती पोलीसांना करीत होती. या संदर्भातील पोलीसांच्या अमानवीय वर्तवणूकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघा पोलीसांना सस्पेंड ( Suspended ) करण्यात आले आहे.

पोलिसांचा एक अमानवीय चेहरा समोर आला आहे. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती, त्या तरुणाची आई पोलिसांना तिच्या मुलाला सोडवा अशी विनवणी करीत होती. त्यावेळी या महिलेला पोलिसांनी कार तशीच पुढे नेत तिला बोनेटवरुनच अर्धा किमीपर्यंत फरफटत नेल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर चहुबाजूंनी टीका झाली आहे. सोमवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी तीन पोलीसांना सस्पेंड केले आहे.

हाच तो व्हायरल व्हिडीओ…

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गोटेगाव येथील सोनू कहार याच्या घरावर धाड टाकून पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. दरम्यान, या तरुणाची आई मोहीनी कहार ही पोलिसांच्या गाडी पुढे उभी राहत विनवणी करीत असताना पोलिसांनी गाडी पुढे रेटत तिला परिसरातून फिरविले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नरसिंगपूरच्या पोलीस अधिक्षकांनी तिघा पोलीसांना बडतर्फ केले आहे.