AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बुरखा घालून घरात घुसून मारायचे डल्ला, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

बुरखा घातलेले दोन लोक घरात घुसून दागिने आणि पैसे चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकत अटक केली.

Mumbai Crime : बुरखा घालून घरात घुसून मारायचे डल्ला, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
| Updated on: Nov 15, 2023 | 11:47 AM
Share

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे, घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यंतरी दादर-माटुंगा परिसरात लेडिज गँगची दहशत पसरली होती. घरातील एकट्या, वयोवृद्ध व्यक्तींना हेरून, घरात घुसून मोबाईलसह मौल्यवान सामान आणि पैसे लुटणाऱ्या लेडीज गँगने धूमाकूळ घातला होता. अखेर तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली. मात्र आता बुरखा गँग मेंबर्सचा धूमाकूळ सुरू झाला. अखेर मुंबई पोलिसांनी बुरखा घालून चोरी करणार्‍या दोन चोरांना अटक केली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात बुरखा घातलेले दोन लोक घरात घुसून दागिने आणि पैसे चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला.

असा उघडकीस आला गुन्हा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत राहणारी महिला आपल्या लहान मुलीला शाळेत सोडण्यासाठी घरातून निघाली. तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि मुलीला शाळेत नेले. मात्र घरी परत आल्यावर तिला घराचा दरवाजा सताड उघडा दिसल्याने ती घाबरली. लगेच आत जाऊन तिने पाहणी केली असता, घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे तिला आढळून आले.

तत्काळ कारवाई करत पोलिसांकडून शोध सुरू

त्यानंतर पीडित महिलेने जवळच्या एमआयडीसी पोलिस ठाण्या जाऊन चोरीची तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी त्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बुरखा घातलेल्या दोन महिला इमारतीत प्रवेश करताना आढळल्या. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, बुरखा घातलेल्या व्यक्ती महिला नसून पुरुष असल्याचे उघड झाले.तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेली टीप याच्याआधारे पोलिसांनी शोध घेत दोन आरोपींना या चोरीप्रकरणी अटक केली. रईस अब्दुल शेख आणि वसीम खालिद खान अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

शेख आणि खान यांच्या अटकेने बुरखा टोळीच्या भीतीने जगणाऱ्या मुंबईतील लोकांना दिलासा मिळाला आहे. ही टोळी अनेक महिन्यांपासून कार्यरत होती आणि त्यांनी शहरात अनेक ठिकाणी हात मारत चोरी केल्याचे उघड झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून टोळीतील इतरही सदस्य आहेत का, याचाही शोध घेत आहेत. तसेच सामान्य नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर त्यासदंर्भात पोलिसांना कळवावे, असेही आवाहन पोलिसांनी केले.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.