इंद्राणी मुखर्जीच्या मुलीने केली ‘ही’ विनंती; न्यायालयाने अर्जच धुडकावला

| Updated on: Sep 08, 2022 | 3:06 AM

इंद्राणी मुखर्जीची दुसरी मुलगी विधीने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तिला इंद्राणीसोबत राहण्याची परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. विधी सध्या परदेशात आहे. पुढील काही दिवसांतच भारतात येणार आहे.

इंद्राणी मुखर्जीच्या मुलीने केली ही विनंती; न्यायालयाने अर्जच धुडकावला
इंद्राणी मुखर्जीच्या मुलीने केली 'ही' विनंती
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukharjee) सध्या जामिनावर बाहेर आहे. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर ती तुरुंगाबाहेर आली. तिच्यावर मुलगी शीना बोराची हत्या (Sheena Bora Murder) केल्याचा गंभीर आरोप आहे. अशा परिस्थितीत ती तुरुंगाबाहेर आली असताना तिच्यासोबत राहण्यासाठी तिची दुसरी मुलगी आसुसलेली आहे. यासाठी तिने न्यायालयात धाव घेतली आणि रीतसर परवानगी (Permission) मागितली. पण न्यायालयाने तिला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत अर्जच धुडकावून लावला.

रीतसर परवानगी मिळवण्यासाठी केला होता अर्ज

इंद्राणी मुखर्जीची दुसरी मुलगी विधीने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तिला इंद्राणीसोबत राहण्याची परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. विधी सध्या परदेशात आहे. पुढील काही दिवसांतच भारतात येणार आहे. भारतात आल्यानंतर तिला तिची आई इंद्राणी मुखर्जीसोबत राहायचे होते. यासाठी तिने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांनी हा निकाल दिला आहे.

ती म्हणते, मला आईसोबत राहण्यापासून वंचित ठेवले!

इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने अधिवक्ता रणजित सांगळे यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यात तिने म्हटले होते की, मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी 2015 मध्ये आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला तिच्या आईसोबत राहण्यापासून वंचित ठेवण्यात आले. आता ती जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. अशा परिस्थितीत तिच्यासोबत राहण्यास परवानगी द्या, अशी याचना विधीने केली होती.

हे सुद्धा वाचा

सीबीआयचे म्हणणे काय?

विधीच्या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला. विधीची याचिका स्वीकारणे हे इंद्राणी मुखर्जीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन आहे. इंद्राणीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यात ती फिर्यादी साक्षीदारावर प्रभाव टाकणार नाही किंवा पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, असे नमूद केले आहे. याकडे सीबीआयने लक्ष वेधले. त्याची दखल घेत न्यायालयाने विधीची याचिका फेटाळून लावली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

विधी मुखर्जी परदेशात असून ती 10 सप्टेंबर रोजी भारतात येणार आहे. ती मायदेशी येण्यापूर्वी तिला तिच्या आई इंद्राणी मुखर्जीसोबत राहण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, अशी तिची इच्छा होती. मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला आहे. एप्रिल 2012 मध्ये इंद्राणी मुखर्जी आणि तिचा तत्कालीन ड्रायव्हर श्यामवर राय आणि तिचा माजी पती संजीव खन्ना यांनी मिळून शीना बोराची कारमध्ये गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.