धार्मिक स्थळांवर नकली सुट्टे पैसे द्यायचे आणि खरे पैसे घ्यायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Feb 03, 2023 | 4:05 PM

आरोपी जिग्नेश गाला याच्या कारमधून सुमारे 9 लाख 46 हजार रुपयांची बनावट जुनी नाणी जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिग्नेश गेल्या अनेक दिवसांपासून नाणी बनवण्याच्या मशीनची निर्यात आणि आयात करत होता.

धार्मिक स्थळांवर नकली सुट्टे पैसे द्यायचे आणि खरे पैसे घ्यायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
दिंडोशी परिसरात बनावट नाणी जप्त
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून 1 रुपये ते 10 रुपयांपर्यंतची सुमारे 10 लाख बनावट तांबे आणि पितळी नाणी जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलीस आणि दिंडोशी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींच्या गाडीतून ही नाणी जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिग्नेश गाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 232, 234, 235, 243, 120 (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिग्नेशला त्याच्या गाडी आणि बनावट नाण्यांसह दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हरियाणात सुरु होता बनावट नाण्यांचा कारखाना

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये ही नाणी बनवण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यावर दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत 5 जणांना अटक केली.

धार्मिक स्थळांवर खोटे सुट्टे पैस द्यायचे

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट नाणी आणायचे आणि धार्मिक स्थळांवर सुट्टे पैसे देण्याच्या नावाखाली खरे पैसे घ्यायचे. बऱ्याच कालावधीपासून आरोपींचा हा खोट्या नाण्यांचा खेळ सुरू होता.

हे सुद्धा वाचा

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुंबईत आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिंडोशीच्या हद्दीत बनावट नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

दिल्ली पोलीस आणि दिंडोशी पोलिसांची संयुक्त कारवाई

या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलीस ठाण्याच्या पथकाने दिल्ली पोलिसांसह मालाड पुष्पा पार्क येथील वल्लभ ए विंग सोसायटीमध्ये संयुक्त कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात बनावट नाणी जप्त करण्यात आली.

आरोपी जिग्नेश गाला याच्या कारमधून सुमारे 9 लाख 46 हजार रुपयांची बनावट जुनी नाणी जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिग्नेश गेल्या अनेक दिवसांपासून नाणी बनवण्याच्या मशीनची निर्यात आणि आयात करत होता.