Raj Kundra | अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण, उद्योजक राज कुंद्रावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा

| Updated on: May 19, 2022 | 11:11 AM

हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजने केनरिनशी करार केला होता आणि त्यासाठी विआनच्या 13 बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Raj Kundra | अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण, उद्योजक राज कुंद्रावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा
Raj Kundra
Image Credit source: ट्विटर
Follow us on

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याविरुद्ध अश्लील चित्रपटांच्या निर्मिती आणि प्रसाराच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, कुंद्राने फेब्रुवारी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करुन ‘हॉटशॉट्स’ नावाचे अॅप विकसित केले.

हॉटशॉट अॅप नंतर यूके स्थित कंपनी केनरिनला विकण्यात आली. विशेष म्हणजे, केनरिन कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी आहेत, जे प्रत्यक्षात राज कुंद्राचे मेहुणे आहेत. पुढे, हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजने केनरिनशी करार केला होता आणि त्यासाठी विआनच्या 13 बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण?

सूत्रांनी पुढे सांगितले की हॉटशॉट्स अॅप खरेतर भारतात बनवल्या गेलेल्या पॉर्न चित्रपटांसाठी एक व्यासपीठ होते. सब्सक्राईबर्सच्या माध्यमातून कमावलेल्या रकमेचा व्यवहार कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजच्या नावावर करण्यात आला.

अशा प्रकारे पॉर्न फिल्म्समधून मिळणारा पैसा यूकेमधून फिरुन कुंद्राच्या कंपनीच्या खात्यात यायचा. राज कुंद्रा याला 19 जुलै 2021 रोजी अश्लील चित्रपटांच्या कथित निर्मितीच्या आरोपाखाली इतर 11 जणांसह अटक करण्यात आली होती. 20 सप्टेंबर रोजी कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई न्यायालयाने 50,000 रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला होता.

राज कुंद्रा याच्यावर ‘हॉटशॉट्स’ नावाच्या सब्सक्राईबर्स संचालित मोबाइल अॅपचा वापर करून पॉर्न फिल्म्सची निर्मिती आणि वितरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, कुंद्राने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.