चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर….

| Updated on: Oct 30, 2021 | 6:57 PM

कल्याणमध्ये एका अल्पवयीन चोरट्याने एका दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा चोरीचा प्लॅन फिस्कटला. त्यानंतर रागावलेल्या चोराने थेट दुकानाला आग लावत दुकान जाळून खाक केलं.

चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर....
कल्याणचे कोळसेवाडी पोलीस पथक
Follow us on

कल्याण (ठाणे) : काही माणसं विकृत असतात. ते आपल्या विकृत मानसिकतेतून काय करतील याचा काहीच भरोसा नाही. पण त्याचा फटका मात्र इतरांना बसतो. असाच काहिसा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन चोरट्याने एका दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा चोरीचा प्लॅन फिस्कटला. त्यानंतर रागावलेल्या चोराने थेट दुकानाला आग लावत दुकान जाळून खाक केलं. या चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. विशेष म्हणजे या आरोपीकडे सात चोरीच्या बाईक सापडल्या आहेत. पोलीस त्याच्या आणखी एका जोडीदाराचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरातील एका मोठ्या कम्प्युटरच्या दुकानाला आग लागली. हे दुकान आगीत जळून खाक झाले. या घटनेत दुकानादाराचे मोठे नुकसान झाले होते. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणाकरीता पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलिसांना तपास करताना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली

या प्रकरणाचा तपास सुरु असताना अखेर पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली. या दुकानात तांत्रिक बिघाडामुळे आग लागली नव्हती. तर दुकानाला आग लावली गेली होती. पोलीस अधिकारी हरीदास बोचरे, डी. एन. घुगे, डी. एन. पवार यांनी आपल्या परीने तपास सुरु केला. त्यातून जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती.

नेमकं काय घडलं?

या दुकानात एक अल्पवयीन चोरटा चोरी करण्यासाठी आला होता. त्याच्या चोरीचा प्रयत्न फसल्याने त्याने दुकानाला आग लावली. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. 16 वर्षाचा हा आरोपी अत्यंत शातीर आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सात बाईक हस्तगत केल्या आहेत. या चोरट्याचा साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी मिळून अन्य किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने डायघर, बाजारपेठ आणि कोळसेवाडी या परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली आहे. हा अल्पवयीन चोरटा इतका शातीर आहे की त्याने अनेकवेळा पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकलीय. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले आहे.

हेही वाचा :

याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोंबिवलीत काय चाललंय?

चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न? आता बुलडाण्यात स्टेट बँकेवर दरोडा, 20 लाखांची रोकड लंपास, महाराष्ट्रात 10 दिवसांत 4 बँकांना लक्ष्य