याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोंबिवलीत काय चाललंय?

डोंबिवलीत बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोंबिवलीत काय चाललंय?
आरोपी बापाला बेड्या


डोंबिवली (ठाणे) : एका बापाचं मुलीच्या आयुष्यात असणं किती गरजेचं असतं हे प्रत्येक मुलीला माहिती आहे. वडील लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्या पोटच्या लेकीला प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ देतात. त्यामुळे मुलीचं एकवेळ आईसोबत फारसं चांगलं जमणार नाही. पण वडिलांशी खूप चांगलं जमतं. वडील आपल्या मुलीसाठी वेळप्रसंगी कठोर होतात, पण ते वेळोवेळी मुलीसाठी, तिच्या भविष्याचा विचार करताना अनेकदा हळवे होतात. आपली मुलगी सासरला गेली तर आपल्यापासून लांब जाईल, ती रोज आपल्यासमोर दिसणार नाही या भावनेने वडील व्याकूळ होतात. वडील आणि लेकीच्या नात्याबद्दल कितीही सांगितलं किंवा चर्चा केली तरी शब्द अपुरे पडतील. पण काही विकृत माणसं या नात्याला हल्ली काळीमा फासणारे कृत्य करत आहेत. त्यांना आपल्या मुलीबद्दल किंवा परिवाराबद्दल काहीच वाटत नाही. ते वासनेत इतके आकांत बुडाले आहेत की कुणासोबत किती विकृत आपण वागतो याचंही त्यांना भान राहत नाही. डोंबिवलीत अशीच एक संतापजनक घटना समोर आलीय.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आरोपी बाप इतकं विचित्र आणि संतापजनक कृत्य कसा करु शकतो? असा सवाल काही स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे आरोपी आठ महिन्याच्या त्याच्या पोटच्या लेकीला दारु पाजवायचा, असा देखील एक संतापजनक प्रकार समोर आलाय.  तसेच डोंबिवलीत गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त नराधमांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना हा असा प्रकार समोर येणं म्हणजे चिंताजनक आहे, असं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जातंय.

आरोपी बापाला बेड्या

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह डोंबिवलीत राहते. पीडितेची आई काही कामानिमित्ताने गावी गेली होती. याच गोष्टीची संधी साधून वासनांध बापाने तिच्याशी लगट करत लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याला प्रतिकार केला असता आरोपी बापाने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण केली. तसेच तिला धमकी देखील दिली. पीडितेची आई गावावरुन परत आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तिने पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी आरोपी बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आठ महिन्याच्या पोटच्या मुलीला दारु पाजायचा

विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिला यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपी हा आपल्या पोटच्या आठ महिन्याच्या मुलीला घरात दारु पाजायचा. त्याच्या या कृत्याचा प्रतिकार करणाऱ्या त्याच्या पत्नीला तो बेदम मारहाण करायचा. त्याच्या पत्नीने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे.

हेही वाचा : सोबत दारु प्यायले आणि एकाने दुसऱ्याला संपवले, नागपुरात आणखी एकाची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI