VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक

| Updated on: Dec 08, 2021 | 8:30 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई परिसरात ससुनवघर या ठिकाणी काल (मंगळवारी) रात्री 11 ते 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक
मुंबई-अहमदाबाद हायवेवर कार पेटली
Follow us on

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई हद्दीत मुख्य रस्त्यावरच कारला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु गाडीची राख झाली. पेटलेल्या कारचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई परिसरात ससुनवघर या ठिकाणी काल (मंगळवारी) रात्री 11 ते 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अपघातात जीवितहानी नाही

इंजिनमधून धूर निघत असल्याने तात्काळ प्रसंगावधान राखून कारमधील सर्व जण बाहेर निघाले. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

आगीवर नियंत्रण, कार जळून खाक

वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात यश मिळवले आहे. मात्र कार पूर्णतः जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. भर रस्त्यात रात्रीच्या सुमारास अचानक कारने पेट घेतल्याने मुख्य रस्त्यावरील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पाहा व्हिडीओ :

नवी मुंबईत बीएमडब्ल्यूच्या गोदामाला आग

दुसरीकडे, नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी प्लॉट नंबर D-207 मध्ये एका BMW गाड्यांच्या गोदामात आग लागल्याने 40 ते 45 गाड्या जाळून खाक झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

BMW Fire : नवी मुंबईतील बीएमडब्ल्यूचं गोदाम जळून खाक, 45 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

ड्रायव्हरला डुलकी, पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला, 35 जण जखमी