ड्रायव्हरला डुलकी, पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला, 35 जण जखमी

मंगळवारी दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना चालकाला डुलकी लागली. त्यामुळे भक्तांनी भरलेली गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून पलटी होऊन अपघात घडला.

ड्रायव्हरला डुलकी, पंढरपूरहून परतणारा भाविकांचा टेम्पो उलटला, 35 जण जखमी
बुलडाण्यात मेटाडोर टेम्पो उलटून अपघात

बुलडाणा : पंढरपूरवरुन दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे दुभाजकावर आदळून हा टेम्पो उलटला. या अपघातात किमान 35 प्रवासी जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील मेरा खुर्द फाट्याजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील खांडवी येथील मेटाडोरचे चालक मालक असलेले अनिल गणेश आणि विकास गणेश हे गावातील, तसेच परिसरातील 35 ते 40 महिला – पुरुष भाविक भक्तांना दर्शनासाठी पंढरपूर येथे घेऊन गेले होते.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना चालकाला डुलकी लागली. त्यामुळे भक्तांनी भरलेली गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात 20 जण किरकोळ, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जालना-चिखली रस्त्यावरील मेरा खुर्द फाट्याजवळ घडली आहे.

चालकाची झोप भक्तांना महागात

जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी आणि परिसरातील भाविक दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर घराकडे येत असताना झोप आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि मेटाडोर रोडवरील दुभाजकावर गेले.

चालकाच्या लक्षात येताच त्याने लगेच गाडीचे ब्रेक लावले. त्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने वळून रोडवर पलटी झाली. मेटाडोर उलटल्यामुळे गाडीतील 35 ते 40 भक्तांना मार लागला. काही जणांची दुखापत किरकोळ स्वरुपाची होती, तर काही भाविकांना गंभीर जखमा झाल्या.

जखमींवर रुग्णालयात उपचार

घटनेची माहिती मेरा खुर्द फाट्यावरील लोकांना कळताच लगेच जखमींना गाडीमध्ये टाकून चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या :

स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक

पुण्यात लॉजमध्ये देहव्यापार, मॅनेजरला बेड्या; दहा महिलांना केलं मुक्त

हात-पाय बांधून लेकाला विहिरीत फेकलं, दुसऱ्या बायकोच्या मदतीने बापानेच काढला काटा

Published On - 7:43 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI