Nanded Murder | हात-पाय बांधून लेकाला विहिरीत फेकलं, दुसऱ्या बायकोच्या मदतीने बापानेच काढला काटा

धर्माबाद तालुक्यातील अतकुर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बापानेच दुसऱ्या पत्नीच्या मदतीने मुलाची हत्या केली आहे. मयत 27 वर्षीय मारोती दारमोड याच्या नावावरची साडेतीन एकर जमीन हस्तगत करण्याच्या वादातून ही घटना घडलीय.

Nanded Murder | हात-पाय बांधून लेकाला विहिरीत फेकलं, दुसऱ्या बायकोच्या मदतीने बापानेच काढला काटा
माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील अतकुर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बापानेच दुसऱ्या पत्नीच्या मदतीने मुलाची हत्या केली आहे. मयत 27 वर्षीय मारोती दारमोड याच्या नावावरची साडेतीन एकर जमीन हस्तगत करण्याच्या वादातून ही घटना घडलीय. आरोपी वडील चंद्रय्या दारमोड यांनी दुसरी पत्नी आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या मदतीने हे हत्याकांड घडवण्यात आलंय.

हात-पाय बांधून त्याला विहिरीत टाकून दिले

मिळालेल्या माहितीनुसार मृत मारोती दारमोड यांच्या वडिलाने आपली दुसरी पत्नी आणि तिच्या मुलाच्या मदतीने मारोती यांचा खून केला आहे. या तिघांनी मारोतीचे हात-पाय बांधून त्याला शेजारच्या शेतातील विहिरीत टाकून दिले. गेल्या दसऱ्याच्या दिवशी हे हत्याकांड घडले होते. मात्र आज विहिरीतील पाणी कमी झाल्याने शेतमालकाला विहिरीत काहीतरी असल्याचे जाणवले.

तब्बल दोन महिने आरोपींकडून मयताचा शोध घेण्याचा बनाव

विहिरीत प्रेत आढळल्यामुले शेतमालक रमाकांत मोकले यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर या हत्येचा उलगडा झालाय. याप्रकरणी मयताचा पिता, सावत्र आई आणि सावत्र भावाला धर्माबाद पोलिसांनी अटक केलीय. तब्बल दोन महिने यातील आरोपी मयताचा शोध घेण्याचा बनाव रचत फिरत होते. मात्र शेवटी तेच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात उघड झालंय.

इतर बातम्या :

Nanded Crime | पत्नीवर संशय घ्यायचा, नंतर शांत डोक्याने घडवलं हत्याकांड; पत्नी, मुलाला संपून घेतला गळफास

Pune Crime | तरुणीला बघून डिलिव्हरी बॉयने उघडली पॅन्टची चेन ; आरोपीला अटक

Aurangabad: झुलेलाल मंदिराचा चोर जेरबंद, 60 वर्षांची अखंड तेवणारी समाईसुद्धा मिळाली, बायकोला पैसे देण्यासाठी पहिल्यांदाच केली चोरी!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI