Nanded Crime | पत्नीवर संशय घ्यायचा, नंतर शांत डोक्याने घडवलं हत्याकांड; पत्नी, मुलाला संपून घेतला गळफास

मयत शांताराम हा संशयी स्वभावाचा होता, त्यातून तो पत्नीच्या वागणुकीवर विनाकारण संशय घेत असे. त्यातून त्याने पत्नी आणि मुलाच्या हत्येचा कट रचला असे पोलीस तपासात उघड झालेय. हा कट रचताना शांतारामने अगदी शांत डोक्याने हत्याकांड घडवलंय.

Nanded Crime | पत्नीवर संशय घ्यायचा, नंतर शांत डोक्याने घडवलं हत्याकांड; पत्नी, मुलाला संपून घेतला गळफास
NANDED MURDER
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 8:04 PM

नांदेड : पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या शांतामन कावळे विरोधात तामसा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शांतामन कावळेने पत्नी आणि मुलाची हत्या करत स्वतः आत्महत्या केली होती. भोकर तालुक्यातील टाकराळा इथल्या जंगलात या तिघांचे मृतदेह काल आढळले होते. त्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणी मयत शांतारामवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय.

मयत शांताराम हा संशयी स्वभावाचा होता, त्यातून तो पत्नीच्या वागणुकीवर विनाकारण संशय घेत असे. त्यातून त्याने पत्नी आणि मुलाच्या हत्येचा कट रचला असे पोलीस तपासात उघड झालेय. हा कट रचताना शांतारामने अगदी शांत डोक्याने हत्याकांड घडवलंय.

शवविच्छेदनातून आलं सत्य बाहेर

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार या घटनेतील मुलाचा आणि आईच्या मृत्यूमध्ये चार दिवसाचा फरक आहे. आरोपीने आधी जंगलात मुलाला आणून संपवलं आणि त्या नंतर पत्नीला तिथे आणून ठार केले असावे असे पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्या नंतर याच ठिकाणी स्वतः आरोपीने गळफास लावून आत्महत्या केलीय.

दुसरा मुलगा बचावला

आरोपी शांतारामने घरी असलेल्या 11 वर्षीय सुजित या मुलाची हत्या केली. मात्र त्याचा 18 वर्षाचा अभिजित मुलगा गायब आहे, आरोपीने त्याचे काही बरे वाईट केले की काय अशी शंका नातेवाईकांनी उपस्थित केलीय. आज सांयकाळपर्यंत बेपत्ता असलेल्या अभिजितचा काही शोध लागला न्हवता. त्याला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक उजागरे यांनी सांगितलंय.

लॉकडाऊन नंतर कुटुंब परतले होते गावी

या घटनेतील शांताराम हा लॉकडाऊनपूर्वी मुंबईत राहून उपजीविका भागवत असे. हाथाला मिळेल ते काम करून शांताराम कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. मात्र लॉक डाउननंतर काम मिळेनासे झाल्याने कुटुंबासह तो हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या मूळ गावी परतला होता. मात्र इथे त्याच्या रिकाम्या मेंदूत संशयाचे भूत शिरले आणि एक हसते खेळते कुटुंब जगातून नाहीसे झाले.

इतर बातम्या :

OBC Reservation: केंद्राने राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Nitin Raut: मुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस, नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा

Non Stop LIVE Update
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.