धक्कादायकः स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक

शहरातील उस्मानपुरा हा नेहमीचा वर्दळीचा भाग आहे. मात्र याच भागात एका स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल कुंटणखाना सुरु होता. भाजीवालाबाई पुतळ्याजवळील सिटी चॉइस स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देहविक्री करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला.

धक्कादायकः स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक
औरंगाबादेत स्पा सेंटरवर धाड

औरंगाबादः स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांचे पितळ औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) उघडे पाडले. शहरातील उस्मानपुरा (Osmanpura) भागात हा गैरप्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता सदर ठिकाणावर छापा मारला. कुंटणखाना (Brothel) चालवणाऱ्या आंटीसह एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही आंटी म्हणजे 28 वर्षांची तरुणी असून मित्राच्या मदतीने स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होती. यात 28 वर्षीय प्रियंका उर्फ अनुष्का भाऊराव इंगळे व तिचा मित्र शेख फईम शेख हुसेन याला पोलिसांनी अटक केली.

भाजीवालाबाई चौकातील सिटी चॉइस स्पा सेंटरवर धाड

शहरातील उस्मानपुरा हा नेहमीचा वर्दळीचा भाग आहे. मात्र याच भागात एका स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल कुंटणखाना सुरु होता. भाजीवालाबाई पुतळ्याजवळील सिटी चॉइस स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देहविक्री करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

दोन पीडितांची सुटका, दोघे अटकेत

या घटनास्थळावर छापा मारला असता तेथे दोन तरुणी देहविक्री करण्यासाठी आलेल्या होत्या. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पीडितेचे काम गेले होते. तिने स्पामध्ये काम सुरू केले. तेव्हा अनुष्काने तिला पैशांचे अमिष दाखवून देहविक्रीसाठी तयार केले. नंतर 22 वर्षीय तरुणीलाही जाळ्यात ओढून वेश्य व्यवसाय सुरु केला.

इतर बातम्या

Essential Oils : डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास दूर करण्यासाठी ही 3 तेल फायदेशीर, वाचा अधिक!

Renault ची किफायतशीर कॉम्पॅक्ट SUV लाँचिंगसाठी सज्ज, Tata Punch ला टक्कर


Published On - 7:14 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI