हत्येच्या दोन घटनांनी मुंबईत खळबळ, अँटॉप हिलमध्ये मृतदेह जाळला, लालबागमध्ये भावाचाच खून

| Updated on: Mar 01, 2022 | 11:40 AM

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हत्येच्या दोन घटनांनी मुंबईत खळबळ, अँटॉप हिलमध्ये मृतदेह जाळला, लालबागमध्ये भावाचाच खून
साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हत्येच्या दोन घटनांनी मुंबई हादरली (Mumbai Crime) आहे. दक्षिण मुंबईतील अँटॉप हिल परिसरात तरुणाची हत्या (Antop Hill Murder) करण्यात आली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून आरोपीचा शोध सुरु आहे. तर लालबागमध्ये (Lalbaug) तरुणाने आपल्या धाकट्या भावाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी उघडकीस आलेल्या हत्येच्या दोन घटनांनी मुंबईत एकच खळबळ माजली आहे.

मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाकट्या भावाची हत्या

लालबाग परिसरात हत्येची दुसरी घटना उघडकीस आली आहे. काळाचौकी परिसरातील चिवडा गल्लीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मोठ्या भावानेच धाकट्या भावाची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. किरकोळ वादातून तरुणाने धाकट्या भावावर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे.

लहान भावाचे मोठ्या भावाच्या मित्रांसोबत भांडण झाले होते. या रागातूनच मोठ्या भावाने धाकट्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 30 वर्षीय आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठा भाऊ अशोक भरुगडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

तीन हजार रुपयांवरुन वाद, नातवाकडून आजोबांची हत्या, कुटुंबीय म्हणतात आईच्या दुसऱ्या लग्नाने मुलगा बिथरलेला