AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन हजार रुपयांवरुन वाद, नातवाकडून आजोबांची हत्या, कुटुंबीय म्हणतात आईच्या दुसऱ्या लग्नाने मुलगा बिथरलेला

राम 8 फेब्रुवारी रोजी वडाळा येथील आजोबांच्या घरी आला होता. रात्री त्याने तिथेच मुक्काम केला होता. सकाळी आजोबांनी नातवाला पैसे परत करण्यास सांगितले, यावरुन दोघांमध्ये वाद झाला, असे पोलिसांनी सांगितले.

तीन हजार रुपयांवरुन वाद, नातवाकडून आजोबांची हत्या, कुटुंबीय म्हणतात आईच्या दुसऱ्या लग्नाने मुलगा बिथरलेला
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 11:04 AM
Share

मुंबई : नातवानेच आजोबांची हत्या (Grand Son killed Grand Father) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. डोक्यात बांबूने वार करुन तरुणाने वृद्धाचा जीव घेतला. या प्रकरणी नवी मुंबईजवळच्या पनवेल शहरातून एका 22 वर्षीय तरुणाला अटक (Navi Mumbai Crime) करण्यात आली आहे. उधार घेतलेले पैसे परत करण्यावरुन झालेल्या वादावादीतून नातवाने आजोबांचा जीव घेतल्याचा आरोप (Murder) आहे. मुंबई क्राईम ब्रँचने प्राथमिक तपासानंतर आरोपी नातवाला बेड्या ठोकल्या. लक्ष्मण कानुजी घुगे असं मयत आजोबांचे नाव आहे. आरोपी सुशांत राम सातपुते याने आधी घेतलेले 3,000 रुपये परत करण्यास आजोबांना सांगितले होते. लहानपणी कुशाग्र असलेला राम आईच्या दुसऱ्या लग्नानंतर बिथरला होता, असा दावा केला जातो.

काय आहे प्रकरण?

“आरोपी सुशांत राम सातपुते हा लक्ष्मण कनुजी घुगे यांचा नातू आहे. तो नवी मुंबईतील नेरुळ येथे त्याच्या आई-वडिलांसह राहतो. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असून तो गांजाचे सेवन करत असल्याचाही आरोप आहे. रामला काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते, पण तो तिथून पळून गेला आणि घरी परतला, असा त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे ” अशी माहिती प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पवार यांनी दिली.

तीन हजारांवरुन वाद

राम 8 फेब्रुवारी रोजी वडाळा येथील आजोबांच्या घरी आला होता. रात्री त्याने तिथेच मुक्काम केला होता. सकाळी आजोबांनी नातवाला पैसे परत करण्यास सांगितले, यावरुन दोघांमध्ये वाद झाला, असे पोलिसांनी सांगितले.

रागाच्या भरात रामने घरातला बांबू उचलला आणि आजोबांच्या डोक्यात अनेक वेळा वार केले. त्यानंतर घराला बाहेरुन कुलूप लावून घटनास्थळावरुन तो पसार झाला.

आजोबा रक्ताच्या थारोळ्यात

“सकाळच्या भांडणाची माहिती शेजाऱ्यांनी रामच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर आरोपीची आई आणि आजी नेरूळहून वडाळा येथे आल्या. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मायलेकी घरी आल्या, तेव्हा त्यांना आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले” असेही पोलिसांनी सांगितले.

तिने घुगेंना शेजाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही कॅमेरांमुळे तपास

“त्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केले, तेव्हा आरोपी नातू वडाळा स्टेशनच्या दिशेने गेल्याचे आढळले. रेल्वे स्थानकावरील कॅमेरे तपासले असता तो पनवेलकडे निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले आणि भायखळा येथील युनिटच्या कार्यालयात आणले” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

जबाब नोंदवून घेतल्यानंतर आरोपीला वडाळा पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले. तिथे त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या :

37 वर्षीय पत्रकाराची भररस्त्यात हत्या, अडीच वर्षांच्या लेकीसह कुटुंबातील चौघांसमोर संपवलं

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

तीन वर्षांपूर्वी विवाह, पदरात लहान मूल, माहेरी जाऊन पत्नीची निर्दयपणे हत्या

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.