AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

37 वर्षीय पत्रकाराची भररस्त्यात हत्या, अडीच वर्षांच्या लेकीसह कुटुंबातील चौघांसमोर संपवलं

गजबजलेल्या जिलानी पुलावरुन ते जात असताना मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ते पाचही जण रस्त्यावर पडले. ते सावरण्याआधी आणि काही समजण्यापूर्वीच चार जणांनी कारमधून खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकूने वार केले.

37 वर्षीय पत्रकाराची भररस्त्यात हत्या, अडीच वर्षांच्या लेकीसह कुटुंबातील चौघांसमोर संपवलं
जुनेद खान पठाण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 14, 2022 | 8:59 AM
Share

सुरत : 37 वर्षीय व्यक्तीची पत्नी आणि तीन मुलींसमोर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मयत जुनेद खान पठाण (Juned Khan Pathan) एका स्थानिक साप्ताहिकात काम करत होते. गुजरातमधील सुरत शहरात (Surat Murder) रांदेर परिसरात रविवारी ही घटना घडली. हत्येच्या वेळी पत्नी आणि तीन मुलींसह शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पठाण जात होते.  चौघा आरोपींनी आधी आपली कार पत्रकाराच्या बाईकवर घातली होती. कारने मागून धडक दिल्यानंतर बाईकवरुन प्रवास करणारे पाचही जण रस्त्यावर पडले. त्यानंतर कोणाला काही कळण्याच्या आधीच कारमधील चौघांनी खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकू खुपसला आणि त्यांची निर्घृण हत्या केली. भर दिवसा भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मयत पत्रकार जुनेद खान पठाण एका स्थानिक साप्ताहिकासाठी काम करत होते. रविवारी ते पत्नी आणि तीन मुलांसह शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी बाईकने निघाले होते.

नेमकं काय घडलं?

गजबजलेल्या जिलानी पुलावरुन ते जात असताना मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ते पाचही जण रस्त्यावर पडले. ते सावरण्याआधी आणि काही समजण्यापूर्वीच चार जणांनी कारमधून खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकूने वार केले.

पादचाऱ्यांनी पठाण यांना जवळच्या रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मुलींचे वय 10 वर्षे, चार वर्षे आहे, तर सर्वात लहान मुलगी अवघ्या अडीच वर्षांची आहे.

वैयक्तिक वादातून हत्येचा संशय

रांदेर पोलिसात खून प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. “प्राथमिक तपासात पठाण यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला चार संशयितांची नावे दिली आहेत” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सुरतमध्ये हत्यांचे प्रमाण घटल्याचा दावा

दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात खुनांचे प्रमाण कमी झाले आहे. “जानेवारी 2021 मध्ये झालेल्या 12 हत्यांच्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये सुरत शहरात फक्त दोन खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये सहा खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत” असे त्यांनी सांगितले.

सिंघल म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात दाखल झालेले आठ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना पकडण्यात आले आहे. सहा हत्या वैयक्तिक शत्रुत्व किंवा कौटुंबिक वादातून घडल्या होत्या.

संबंधित बातम्या :

 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...