Bunty Bubbli | बंदुकीच्या धाकाने खंडणी वसुली, मुंबईत बंटी-बबली जोडगोळी जेरबंद

| Updated on: May 11, 2022 | 2:10 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीवर चारकोप, एमएचबी, मालवणी, मालाड आणि कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी, स्नॅचिंग, खंडणी आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Bunty Bubbli | बंदुकीच्या धाकाने खंडणी वसुली, मुंबईत बंटी-बबली जोडगोळी जेरबंद
मुंबईत बंटी बबलीची जोडगोळी जेरबंद
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मुंबई : बंदुकीच्या जोरावर तरुण-तरुणीच्या जोडगोळीने खंडणी वसुली (Ransom) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी बंटी बबलीला (Bunty Bubbli) अटक केली आहे. पिस्तुलासह या दोघांना रंगेहाथ बेड्या (Mumbai Crime News) ठोकण्यात आल्या आहेत. आदम शेर मुहम्मद खान उर्फ बंटी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वय 28 वर्ष आहे. तरुणीचे नाव श्वेता सूर्यकांत लाड उर्फ बबली असून ती 24 वर्षांची आहे.

काय आहे प्रकरण?

बंटी आणि बबली पिस्तूल घेऊन कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. चौकशीत बंटी आणि बबली यांनी पिस्तुलाच्या जोरावर कांदिवली आणि परिसरात खंडणी वसुली केल्याचे निष्पन्न झाले.

तरुणावर 13, तर तरुणीच्या विरोधात 3 गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीवर चारकोप, एमएचबी, मालवणी, मालाड आणि कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी, स्नॅचिंग, खंडणी आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा

बंटीविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असून, त्याची गर्लफ्रेंड बबलीविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत, बंटी अनेकदा तुरुंगातही गेला आहे.