AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लटकवलेली पँट चोरली, खिशातल्या एटीएम कार्डवरच आयता पिन नंबर सापडला, मग काय…

एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.

घरात लटकवलेली पँट चोरली, खिशातल्या एटीएम कार्डवरच आयता पिन नंबर सापडला, मग काय...
आरोपी भंगार विक्रेत्या महिला सीसीटीव्हीत कैद
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 05, 2021 | 1:49 PM
Share

अंबरनाथ : घरात लटकवलेली पँट भंगारवाल्या महिलांनी चोरून नेल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात घडली आहे. या पँटमध्ये असलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रं हेदेखील महिलांनी लंपास केलं. याशिवाय एटीएम कार्ड वापरुन बँक खात्यातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेआठ हजार रुपयांची रोकडही काढून घेतली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरल्या

अंबरनाथ पूर्वेच्या आंबेडकर नगर भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी सात वाजताच्या सुमारास दोन भंगारवाल्या महिला या परिसरात फिरत होत्या. त्यावेळी त्यांचं लक्ष बाळासाहेब लिंबाळे यांच्या घराकडे गेलं. या घराचा दरवाजा उघडा असल्यानं महिला घरात शिरल्या. त्यांनी घरात जाऊन दरवाजाला लटवकलेली पॅण्ट चोरली आणि पोबारा केला.

ही सगळी घटना या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या पँटमध्ये लिंबाळे यांचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं होती.

एटीएम कार्डवरच पासवर्ड लिहिणं महागात

धक्कादायक बाब म्हणजे एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.

महिलांचा शोध सुरु

यानंतर आता या महिलांना पकडण्याची मागणी लिंबाळे यांनी पोलिसांकडे केली आहे. तर पोलिसांनी लिंबाळे यांच्या तक्रारीनुसार या महिलांचा शोध सुरू केला आहे.

बदलापुरात दुकानातून मोबाईल चोरी

दुसरीकडे, बदलापुरात दुकानात मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्याने चोरटा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेला घडलेली ही घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दोन मोबाईल चोरुन धूम

बदलापूर पश्चिमेला नीरज मिश्रा यांचं श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे. या दुकानात 1 सप्टेंबर रोजी एक चोरटा मोबाईल विकत घेण्यासाठी आला. त्याचा साथीदार दुकानाच्या बाहेरच गाडी चालू करून थांबला होता. यावेळी या चोरट्याने मोबाईल बघता बघता विवो कंपनीचे दोन मोबाईल घेऊन धूम ठोकली.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
यानंतर साथीदारासह तो बदलापूर स्टेशनच्या दिशेनं पळून गेला. हा चोरटा पळून जात असताना दुकानातल्या मुलाने त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र चोरटे पळून गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
संबंधित बातम्या :

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...