वाशीमध्ये पुजाऱ्याकडूनच जैन मंदिरात 10 लाखाची चोरी, वाशी येथील धक्कादायक घटना

वाशी पोलिसांनी मंदिरातील 2 लाख 30 हजारांची रोख रक्कम आणि सोन्याच्या दोन बिस्किटांची चोरी जैन मंदिरातील पुजाऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पुजाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. प्रकाशकुमार दुर्गाशंकर रावल (30) असे या पुजाऱ्याचे नाव असून तो मंदिरातील पुजाऱ्याच्या हाताखाली काम करत होता.

वाशीमध्ये पुजाऱ्याकडूनच जैन मंदिरात 10 लाखाची चोरी, वाशी येथील धक्कादायक घटना
सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा जेरबंद
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 3:49 PM

नवी मुंबई : मंदिरात आपण सारे मोठ्या भक्तिभावाने जाऊन परमेश्वराला नमस्कार करून आशिर्वाद घेतो. शिवाय त्या परमेश्वराला लीन होऊन सातत्याने त्याची भक्ती करणार पुजारी सुद्धा आपण देवासमान मानतो आणि त्याच्या पायाशी नतमस्तक होतो. मात्र, नवी मुंबईतील वाशी येथे पुजाऱ्याने मंदिरातच चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतर भोंदू बाबांप्रमाणेच हा पुजारी सुद्धा भक्षक बनून लूटमार करणारा निघाला. शिवाय हा पुजारी ऑनलाईन रमी खेळत असल्याने त्याने दोन लाख रुपये त्यात खर्च केले आहेत. तर 30 हजार रुपये गावी कुटुंबियांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पाठवले असल्याची कबुली त्यांने पोलिसांनी दिली आहे. रमीसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये कोणाच्या नावावर खर्च केले याचा तपास पोलीस करत आहे. (Theft of Rs 10 lakh from a priest in a Jain temple in Vashi, a shocking incident in Vashi)

जैन मंदिरात तब्बल 10 लाख 30 हजार रुपयाची चोरी

वाशी सेक्टर 9 मधील बस डेपोलगत असलेल्या जैन मंदिरातील मुख्य लॉकरमधील 2 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची दोन बिस्कीटे अशी तब्बल 10 लाख 30 हजारांचा ऐवज चोरीची घटना गत आठवड्यात घडली होती. त्यामुळे मंदिरातील ट्रस्टींनी याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाशी, सेक्टर-9 मधील जैन मंदिरात चोरी करणाऱ्या पुजाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 8 लाख रुपयांची सोन्याची दोन बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत. वाशी पोलिसांनी मंदिरातील 2 लाख 30 हजारांची रोख रक्कम आणि सोन्याच्या दोन बिस्किटांची चोरी जैन मंदिरातील पुजाऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पुजाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. प्रकाशकुमार दुर्गाशंकर रावल (30) असे या पुजाऱ्याचे नाव असून तो मंदिरातील पुजाऱ्याच्या हाताखाली काम करत होता.

पोलीस तपासात पुजाऱ्याने दिली चोरीची कबुली

याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. दरम्यान, जैन मंदिरात रंगकाम करण्यासाठी मंदिरातील पुजारी योगेश रावल यांनी 17 ऑगस्ट रोजी ट्रस्टी सुकनराज जैन यांच्याकडून मंदिराच्या चाव्या घेतल्या होत्या. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी योगेश रावल यांनी मंदिराच्या चाव्या परत दिल्या होत्या. याचदरम्यान रंगकाम करण्यासाठी मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांसाठी बंद करुन ठेवण्यात आले होते. याच कालावधीत मंदिरात चोरी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे याबाबत माहिती असलेल्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी मंदिरातील सर्वांची चौकशी सुरु केली केली असता, मंदिरातील पुजाऱ्याच्या हाताखाली काम करणारा पुजारी प्रकाश रावल याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळून आले.

त्यानुसार पोलिसांनी प्रकाश रावल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्यानेच सदरची चोरी केल्याची कबुली दिली. रंगकाम सुरु असताना मंदिरातील मुख्य पुजारी योगश रावल मंदिराच्या चाव्या मंदिरात ठेवून जेवण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश रावल याने सदर चाव्या घेऊन लॉकरमधील दोन सोन्याचे बिस्कीट आणि 2 लाख 30 हजार रुपये असा सुमारे 10 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली. तसेच आरोपीकडून 8 लाख रुपये किंमतीची सोन्याची 2 बिस्कीट हस्तगत करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (Theft of Rs 10 lakh from a priest in a Jain temple in Vashi, a shocking incident in Vashi)

इतर बातम्या

Video: दिल्लीची जेव्हा मुंबई होते, संभाजी छत्रपतींच्या घरातही पाणी पाणी

मंडळासमोर स्थिर ढोल वादनाला परवानगी द्या, पुण्यातल्या गणेश मंडळांची पोलिसांकडे मागणी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.