घरासमोर खेळणारा चिमुरडा अचानक गायब, शोधाशोधीनंतर विहिरीत मृतदेह, डोंबिवलीत हळहळ

| Updated on: Sep 17, 2021 | 1:31 PM

गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

घरासमोर खेळणारा चिमुरडा अचानक गायब, शोधाशोधीनंतर विहिरीत मृतदेह, डोंबिवलीत हळहळ
डोंबिवलीत चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू
Follow us on

डोंबिवली : घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. 5 वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.

पाच वर्षांचा चिमुरडा शेजारच्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमधील खंबाळपाडा भोईरवाडी येथील सिताई नगर मध्ये घडली आहे. सिद्धार्थ गणेश कानगट्ट असे या मयत मुलाचे नाव आहे. सिद्धार्थ दिव्यांग होता. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

सिद्धार्थचा मृतदेह विहिरीत सापडला

दुपारच्या सुमारास शेजाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता सिद्धार्थ पाण्यावर तरंगताना आढळला. नागरिकांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुलडाण्यात नदीपात्रात सेल्फीसाठी गेलेला तरुण बुडाला

दुसरीकडे, गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेनंतर काही तासांनी अनिल सरोकार या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात मृतदेह आढळला होता

जळगावात वाढदविशीच तरुणाचा मृत्यू

वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी घडली होती. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह दुपारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

संबंधित बातम्या :

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

बैल धुण्यासाठी मित्रांसोबत गेला, घरी परतलाच नाही, बुलडाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पाय घसरुन लहान भाऊ शेततळ्यात पडला, मोठ्याच्या जीवाचा आटापिटा, भावाला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली, पण…

वाढदिवशीच मृत्यूने गाठलं! धबधब्यावर सेलिब्रेशनला गेलेल्या 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू