चारित्र्याच्या संशयातून मारहाण, पत्नी पोलिसांकडे निघाल्याने भररस्त्यात पतीचा चाकूहल्ला, डोंबिवलीत थरार

चारित्र्य आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून पतीने पत्नीला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर पतीने भररस्त्यात चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

चारित्र्याच्या संशयातून मारहाण, पत्नी पोलिसांकडे निघाल्याने भररस्त्यात पतीचा चाकूहल्ला, डोंबिवलीत थरार
crime
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 6:39 AM

डोंबिवली : चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने केलेल्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी पत्नी पोलीस स्टेशनला निघाली होती. यावेळी पतीने पत्नीवर भररस्त्यात हल्ला (Husband Attacks Wife) केल्याचा आरोप आहे. नवऱ्याने आपल्या बायकोवर चक्क चाकूने वार केले. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivali Thane Crime News) घडल्याचे उघडकीस आले आहे. पतीच्या हल्ल्यात पत्नी जखमी झाली आहे. जखमी पत्‍नीला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पती पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

चारित्र्य आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून पतीने पत्नीला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर पतीने भररस्त्यात चाकूने वार केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पत्नी जखमी, पती फरार

जखमी पत्‍नीला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ देवकर असे या पतीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, पुण्यात भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला

CCTV | जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार, गोळी चुकवल्याने तरुण बचावला, पुण्यातील बिबवेवाडीत थरार