क्षुल्लक कारणातून झालेला वाद जीवावर बेतला, भाच्याने मावशीच्या पतीचा काटा काढला !

काकाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मालवणी पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर पोलिसांना उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे.

क्षुल्लक कारणातून झालेला वाद जीवावर बेतला, भाच्याने मावशीच्या पतीचा काटा काढला !
मालाडमधील हत्येप्रकरणातील आरोपी अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 10, 2023 | 9:41 PM

मुंबई : क्षुल्लक वादातून भाच्यानेच आपल्या मावशीच्या पतीची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडमधील मालवणी परिसरात घडली आहे. राजू शिवबहादूर कनोजिया असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकाची हत्या करुन आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला होता. मात्र मालवणी पोलिसांनी कसून शोध घेत उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुल्तान मेहताब शाह असे 20 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

आरोपी आणि मयत एकाच परिसरात राहत होते

राजू कनोजिया हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत होता. याच परिसरात राजूच्या पत्नीची बहिण मुन्नी शाह याच परिसरात राहते. मुन्नीला दोन मुले आहेत. दोघी बहिणी एकाच परिसरात राहत असल्यामुळे राजूचे मुन्नीच्या घरी येणे-जाणे होते.

काही कारणातून राजू आणि सुल्तानमध्ये भांडण झाले

सवयीप्रमाणे राजू 25 डिसेंबर रोजी 2022 रोजी मुन्नीच्या घरी गेला होता. यावेळी काही कारणावरुन राजू आणि सुल्तान यांच्यामध्ये भांडण झाले. याच भांडणातून सुल्तानने राजूच्या घरी घुसून त्याची हत्या केली.

कसून शोध घेत उत्तर प्रदेशातून आरोपीला केले अटक

काकाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मालवणी पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर पोलिसांना उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे.

दरम्यान, राजू आणि सुल्तानमध्ये नेमके कोणत्या कारणातून भांडण झाले? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच हत्येचे खरे कारण उघड होईल.