VIDEO | दिंडोशीतील एटीएम लुटण्यासाठी तिघे शिरले, हैदराबादमधून एक कॉल, आणि…

| Updated on: Jul 10, 2021 | 7:33 AM

गोरेगाव पूर्व येथील संतोष नगरमधील मंत्री पार्कच्या समोर असलेले एसबीआय एटीएम लुटण्यासाठी हे आरोपी प्रयत्न करत होते. तेव्हाच एटीएममध्ये लागलेल्या सर्व्हिलन्स सिस्टमच्या माध्यमातून हैदराबाद कंट्रोल रुमला ही माहिती मिळाली.

VIDEO | दिंडोशीतील एटीएम लुटण्यासाठी तिघे शिरले, हैदराबादमधून एक कॉल, आणि...
दिंडोशीत एसबीआयचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न
Follow us on

मुंबई : मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींकडून कटर मशीन, रॉड या व्यतिरिक्त अन्य सामग्रीसुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. हैदराबादमधून सूत्र हलल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी तातडीने पावलं उचलली, त्यामुळे एटीएम लुटीची मोठी घटना टळली. (Mumbai Gang trying to rob ATM at Dindoshi arrested)

नेमकं काय घडलं?

गोरेगाव पूर्व येथील संतोष नगरमधील मंत्री पार्कच्या समोर असलेले एसबीआय एटीएम लुटण्यासाठी हे आरोपी प्रयत्न करत होते. तेव्हाच एटीएममध्ये लागलेल्या सर्व्हिलन्स सिस्टमच्या माध्यमातून हैदराबाद कंट्रोल रुमला ही माहिती मिळाली. दिंडोशीमधील संतोष नगर भागातील एटीएम मशीन लुटण्यासाठी काही आरोपी तोडफोड करत असल्याचं त्यांना दिसलं. हैदराबाद कंट्रोल रुममधून दिंडोशी पोलिसांना फोनद्वारे याची सूचना देण्यात आली.

हैदराबाद कंट्रोल रुमच्या कॉलनंतर दिंडोशी पोलिस लगेच एटीएमच्या जवळ पोहोचले. तिथे त्यांना एटीएम मशीन तोडण्याच्या प्रयत्न करणारे काही जण सापडले. तेव्हा त्वरित पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. पकडलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव हितेश रामनिवास गुप्ता असून त्याचं वय 21 वर्षे आहे.

पाहा व्हिडीओ :

नागपूरमध्ये एटीएममधून हायटेक चोरी

दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नुकतंच नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे.

संबंधित बातम्या :

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास

(Mumbai Gang trying to rob ATM at Dindoshi arrested)