
मुंबई : मुंबईतल्या स्टंटबाज सोनसाखळी चोराला (Mumbai theft Chain Snatcher) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. हा सोनसाखळी चोर बाईटवर स्टंटबाजीही करायचा. या बाईक स्टंटबाजीचे (Bike Stunt theft) व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर अपलोड केले होते. गेल्या काही दिवसांपासून हा स्टंटबाज चोरांचा पोलीस शोध घेत होते. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. या स्टंटबाज चोराला पोलिसांनी (Mumbai crime news) गोवंडीतून अटक करण्यात आली आहे. तसंच त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि बाईकही जप्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या स्टंटबाज चोराने सोनसाखळी चोरी केली होती. याबाबतची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. तसंच घटनास्थळाच्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना या चोरट्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि अखेर त्याला अटक केली आहे. आता या चोराची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. त्यानंतर आता अशाप्रकारे त्यांने आणखी किती जणांच्या चैन हिसकावून पळ काढला आहे, याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय.
मोबाईल आणि चेन हिसकावण्यापूर्वी हा स्टटंबाज तरुण आधी दुचाकी चोरत होता. चोरलेल्या दुचाकीने महिलांच्या गळ्यातील चेन आणि मोबाईल हिसकावून तो फरार व्हायला. चोरलेल्या दुचाकींवरुन त्यानं स्टंटबाजी सुरु केलेली होती. गेल्या काही दिवसांपासून या फरार स्टंटबाज चोराचा शोध पोलीस घेत होते. अखेरमुंबईतील कुरार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या हाती लागण्याच्या भीतीने आरोपी दुचाकी कोणत्याही निर्जन ठिकाणी खड्ड्यात फेकून देत असे. मोहम्मद मोहसीन लायक अहमद अन्सारी उर्फ रायडर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मुंबईच्या रस्त्यावर बाईकचे स्टंट देखील करतो. अटक करण्यात आलेला आरोपी हा गोवंडी येथील रहिवासी आहे. चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर दाखल आहेत.
आरोपी कुरार पोलिसांच्या हद्दीत एका किन्नरच्या गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याची चेन खेचून फरार झाल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार आल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटली. त्यानंतर 19 जुलै रोजी त्याला गोवंडी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, 30 ग्रॅम सोन्याची चेन आणि 1 पल्सर दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.