पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, मुंबई सेशन कोर्टाचा निकाल

| Updated on: Aug 13, 2021 | 11:26 PM

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हे बेकायदेशीर नाही, असा निकाल देत मुंबई सेशन कोर्टाने आरोपी पतीचा जामीन मंजूर केला आहे.

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, मुंबई सेशन कोर्टाचा निकाल
2013 मधील हत्या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Follow us on

मुंबई : पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हे बेकायदेशीर नाही, असा निकाल देत मुंबई सेशन कोर्टाने आरोपी पतीचा जामीन मंजूर केला आहे. ज्या महिलेने याबाबत तक्रार केलीय तिचं लग्न 22 नोव्हेंबर 2020 रोजी झालं होतं. लग्नाला एक महिना झाल्यानंतर तिच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध बनविण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला होता. त्यावर कोर्टात सुनावणी झाली.

तक्रारदार महिलेचे नेमके आरोप काय?

लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच सतत टोमणे मारणं, शिवीगाळ करणे असा प्रकार करुन त्रास दिला जात होता. लग्नाला एक महिना झाल्यानंतर पतीने आपल्या मनाविरुद्ध जबदरस्ती करत शरीरिक संबंध बनविण्यासाठी जबरदस्ती केली, असे आरोप पत्नीने केले होते. त्यावर हे कायदेशीर चौकशीचे प्रकरण नाही, असं सेशन कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार महिला लग्नानंतर 2 जानेवारीला आपल्या पतीसह महाबळेश्वरला गेली होती. तिथे पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिला डॉक्टरांकडे गेली असता तपासणीनंतर तिच्या कमरेच्या भागात लकवा मारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, असा दावा महिलेने तक्रारीमध्ये केला होता. महाबळेश्वरच्या घटनेनंतर महिलेने आपल्या पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात मुंबईत तक्रार केली होती.

ठोस पुरावे नसल्याने पतीचा जामीन मंजूर

याप्रकरणी महिलेच्या पतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यादरम्यान सेशन कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, असं पतीने कोर्टाला सांगितलं. याशिवाय तक्रारदार महिलेच्या इतर आरोपां संदर्भात कोर्टाला ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे कोर्टाने पतीचा जामीन मंजूर केला.

‘पतीच्या कुटुंबियांना जबाबदार धरणं योग्य नाही’

“तुम्हाला लकव्याचा त्रास झाला याबद्दल सहानुभूती आहे. यासाठी पती आणि त्यांच्या कुटुबियांना जबाबदार धरणं योग्य होणार नाही. म्हणून पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येतोय”, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

हेही वाचा :

पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं

तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण…