AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj : एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला.. Video होतोय तूफान व्हायरल

भारताने पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. रविवारी न्युझीलंडला हरवून भारत पुन्हा , सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. मात्र या मॅचनंतर मोहम्मद सिराजच्या व्हिडीओची एक छोटीशी क्लिप व्हायरल झाली असून तो जे बोललाय, त्यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?

Mohammed Siraj : एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला.. Video होतोय तूफान व्हायरल
मोहम्मद सिराजImage Credit source: social media
| Updated on: Mar 09, 2026 | 1:01 PM
Share

काल, 8 मार्चचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय होता. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही, असं काम भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवलं. काल रात्री, भारतीय संघानेT20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एक अतुलनीय विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघ तीन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ आणि सलग दोन T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा विक्रमही आता भारताच्याच नावे आहे. हे सगळं तर तुम्ह आततापर्यंत वाचलंच असेल, कळंलही असेल. पण आता अशी गोष्ट जाणून घेऊया, जी बऱ्याच जणांना माहीत नसेल. भारताचा खेळाडू,उत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे, असं काय आहे त्या व्हिडीओत ?

असं काय बोलून गेला मोहम्मद सिराज ?

काल रात्री अंतिम सामना जिंकून T20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियातील वेगवेगळ्या खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता कसं वाटतंय, काय भावान आहेत हे अनेकांना विचारण्यात आलं. याचदरम्यान, भारतीय संघातील गोलंदाज, मोहम्मद सिराजला विचारण्यात आलं की, प्लेइंग 11 मधून बाहेर असल्याने, भारताच्या विजयात त्यानं आणि कुलदीप यादवचं काय योगदान दिलं? हा प्रश्न ऐकून त्याने जे उत्तर दिलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं. सिाज म्हणाला, ‘हो, आमची (विजयात) भूमिका खूप मोठी आहे कारण आम्हाला बाहेर बसून गोलंदाजांना पाणी पाजावं लागलं.’ बास हा व्हिडीओ इथेच कट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय पण एवढीशी क्लिपही खूप व्हायरल झाली आहे. मजेमजेत दिलेलं त्याचं हे उत्तर खूप व्हायरल झालंय.

नेमकं काय म्हणाला होता सिराज ?

पण तुम्ही आत्ताच जो व्हिडिओ पाहिला, तो तर व्हायरल होत असलेल्या मुलाखतीमधला छोटा भाग, छोटीशी क्लिप आहे. त्यानंतर @StarSportsIndia या अकाउंटवर संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराजने या प्रश्नाचं पूर्ण उत्तर काय दिलं ते स्पष्ट दिसलं आहे. ” संघाच्या बाहेर बसणं, ही देखील खूप मोठी भूमिका असते. कारण लोकांना पाणी देणे, नेटमध्ये गोलंदाजी करणे, सकारात्मक संघाचे वातावरण राखणे आणि नेहमी संघाला प्राधान्य देणे. या सर्व गोष्टी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देतात. कोणत्याही वैयक्तिक ध्येयापेक्षा संघाचे ध्येय अधिक महत्त्वाचे असते.” असं त्याने सांगितलं. संघात समावेश व्हावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, पण टीम कॉम्बिनेशनमुळे बाहेर बसावं लागू शकतं, कारण संघ हा सर्वात महत्वाचा असतो, असंही सिराजने नमूद केलं.

सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असलेली ही छोटी क्लिप पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. ” एखाद्याला पाणी देणं हे खूप चांगलं, शुभ, पुण्याचं काम आहे “, असं एकाने लिहीलं. तर “मित्रा, आजकाल इतके खरं कोण बोलतं ?” असा सवाल एका युजरने विचारला. “विचारपूर्वक कमेंट करा मित्रांनो. डीएसपी साहेब तुम्हाला तुरुंगात घेऊन जातील आणि काठीने मारतील.” अशी मजेशीर कमेंटही एका युजरने केली आहे.

Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका