Mumbai NIA Raid : दाऊदचं नाव, पण निशाण्यावर नवाब मलिक? एनआयएकडून दोघे ताब्यात, दोघेही मलिकांशी संबंधित
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (Mumbai NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. दाऊदचं नाव समोर येत असलं, तरी निशाण्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) असल्याचं दिसत आहे. मलिक यांचा व्यावसायिक भागीदार सुहेल खांडवानी (Suhail Khandwani) याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. तर सलीम फ्रुटसह दोघांना एनआयएने ताब्यात घेतलं असून दोघेही मलिक यांच्याशी संबंधित आहेत.
कोण आहे सुहेल खांडवानी?
सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे.
पाहा एएनआयचे ट्वीट
काय आहे प्रकरण?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.
एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका मानला जातो.