रिक्षा चोरणाऱ्या टोळीला अटक; 14 रिक्षा जप्त, कवडीमोल भावाने करत होते वाहनांची विक्री

| Updated on: Dec 24, 2021 | 6:33 AM

लाखो रुपयांच्या ऑटो रिक्षा चोरून त्या कवडीमोल भावात विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या 4 जणांच्या टोळीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

रिक्षा चोरणाऱ्या टोळीला अटक; 14 रिक्षा जप्त, कवडीमोल भावाने करत होते वाहनांची विक्री
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : लाखो रुपयांच्या ऑटो रिक्षा चोरून त्या कवडीमोल भावात विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या 4 जणांच्या टोळीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या 31 जुलैला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मुकेश पाडाळे यांनी त्यांच्या घरासमोर उभी असलेली ऑटो रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या रिक्षा चोरीचा तपास सुरू असतानाचा त्यांना आरोपींची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत पोलिसांनी चर जणांना अटक केली आहे.

‘अशी’ मिळाली आरोपींची माहिती 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 31 जुलैला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मुकेश पाडाळे यांची त्यांच्या घरासमोर उभी असलेली ऑटो रिक्षा चोरीला गेली होती. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरू होता. तपासादरम्यान शहरात रिक्षा चोरणाऱ्यांची टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी आरोपी सिद्धेश मांढरे आणि विक्रांत जाधव यांना रिक्षा चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता अटक केली.

10 ते 12 हजार रुपयांना रिक्षांची विक्री

आरोपींची चौकशी सुरू असताना  त्यांनी एकूण 14 रिक्षा चोरल्या असून, त्या डोंबिवली, वाकोल, कोपरी, कल्याण  परिसरामध्ये विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या रिक्षा कवडीमोल भावाने म्हणजेच 10 ते 15 हजार रुपयांना विकल्या होत्या. पोलिसांनी संबंधित ठिकाणावरून या 14 ही रिक्षा जप्त केल्या आहेत. दरम्या या टोळीत आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? त्यांनी आजून काही रिक्षा चोरी केल्या होत्या का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Wardha: पेपरफुटी घोटाळ्याच्या सूत्रधाराचे वर्धा कनेक्शन, प्रीतीश देशमुखने वर्धेतही मोठी मालमत्ता खरेदी केल्याची चर्चा

Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

Nagpur Crime | एक-दोन नव्हे तब्बल 8 गाड्या चोरल्या; कारण ऐकूण पोलीसही चक्रावले!