VIDEO : गुन्हेगाराला केक भरवताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनेकांकडून कारवाईची मागणी, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 14, 2021 | 11:12 PM

जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेरलेकर यांनी एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO : गुन्हेगाराला केक भरवताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनेकांकडून कारवाईची मागणी, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : कोरोना संकट काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. पण अशा काळात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेरलेकर यांनी एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलीस निरीक्षक महेंद्र नेरलेकर सराईत गुन्हेगारासोबत केक कापताना स्पष्टपणे दिसत आहेत.

आरोपीचा हातात तलावर घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

संबंधित आरोपीचं नाव दानिश इश्तिखार सय्यद असं आहे. दानिश हा जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीत वास्तव्यास आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दानिशवर गोरेगाव पोलीस ठाण्यात सीआर नंबर 165/2018 च्या कमल 307,148, 504 अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जामीनावर आहे.

सर्वसामान्यांकडून पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी

काही दिवसांपूर्वी दानिशचा जन्मदिवस होता. त्याने मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दानिशच्या घरी दाखल झाले. त्यांनी दानिशसोबत त्याच्या वाढदिवसाचा केकही कापला. संबंधित घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे (senior police inspector celebrate criminals birthday).

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : ‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं