नशा करण्यासाठी सिरपचा वापर, परराज्यातील आरोपींकडून मोठा साठा जप्त
कल्याण परिमंडळ ३ मध्ये अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष कारवाई पथक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त मोहीम राबवत नशेसाठी वापरण्यात येणारी कोडीन फॉस्फेट सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे.

सरकारने कोडीन आधारित सिरपवर बंदी आणली आहे. त्यानंतरही नशा करण्यासाठी काही जणांकडून कोडीन सिरपचा वापर केला जातो. कल्याण पोलिसांनी कोडीन सिरपची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत २७ हजार रुपये आहे.
कल्याण परिमंडळ ३ मध्ये अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष कारवाई पथक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त मोहीम राबवत नशेसाठी वापरण्यात येणारी कोडीन फॉस्फेट सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. हा साठा बाळगणाऱ्या तिघा परराज्यीय आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाटल्यांची किंमत २७,००० रुपये
पोलिसांना काही संशयित लोकांकडे कोडीन सिरपचा साठा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. त्यांच्याकडे कोडीन सिरप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चौकशी सुरु केली. तौसिफ सुर्वे ,लिंगराज आलगुड व इरफान सय्यद या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ‘ANREX COUGH SYRUP’ (Codeine Phosphate + Triprolidine HCl) चे १०० मि.लिच्या १२० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे २७,००० रुपये इतकी आहे.
आरोपींवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम ८(क), २२(क) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी गुलबर्गा, कर्नाटक येथील आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना हे सिरप कोणी दिले, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
संभाजीनगरात परराज्यातील ड्रग्स कनेक्शन
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमधील एका फार्मा कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेतलेल्यास अटक करण्यात आली. मुख्य आरोपी बबन खान याला त्याच्या दोन मुलांसह वाहनचालक आणि इतर एक आरोपी अशा पाच आरोपींना अटक केली. कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यातील ड्रग्ज तस्करांकडे पुरवठा करत होता, असे तपासातून समोर आले आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा ड्रग्जचे मुंबई, गुजरात कनेक्शन समोर आले आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी बबन खान नजीर खान , त्याची दोन मुले कलीम खान बबन खान , सलीम खान बबन खान , वाहनचालक शफीफुल रहेमान तफज्जूल हुसेन आणि राज रामतिरथ अजुरे या पाच आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीतील पावडर गोदामात जमा करून खान मुंबई, गुजरातसह अन्य राज्यात पुरवठा करत होता. त्याने अनेक व्यवहार हे बिटकॉइनमार्फत केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, कंपनीतील कोणते अधिकारी, कर्मचारी या गुन्ह्यात सहभागी आहेत का..? याचा पोलिस तपास करणार आहेत.
