टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

| Updated on: Sep 14, 2021 | 9:20 AM

मुंबईतील धारावीत धक्कादायक प्रकार घडला आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. धरावी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर या मुलीने उंदीर मारण्याच्या विषाने दात घासले.

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू
Death
Follow us on

मुंबई : मुंबईतील धारावीत धक्कादायक प्रकार घडला आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. धरावी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर या मुलीने उंदीर मारण्याच्या विषाने दात घासले. नजरचुकीने तिने टूथपेस्ट समजून विष ब्रशवर घेतलं आणि थेट दात घासण्यास सुरुवात केली. मात्र चव वेगळी लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. यामध्ये मुलीची मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

मृत्यू झालेली मुलगी धारावीत राहात होती. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे ती ब्रश करण्यासाठी गेली. अर्धवट झोपेत असल्यामुळे तिने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याचं औषध घेतलं. नजरचुकीने हा प्रकार घडला. मुलीने ब्रश करण्यास सुरुवात केली. मात्र तोंडभर ब्रश फिरवून झाल्यानंतर तिला टूथपेस्टची चव वेगळी असल्याचं लक्षात आलं. मात्र तोवर उशीर झाला होता.

तिच्या शरिरात विष भिनायला सुरुवात झाली होती. मुलीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा रविवारी मृत्यू झाला.

या सर्व प्रकाराने कुटुंबाला धक्का बसला आहे. नजरचुकीने घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण कुटुंब हादरुन गेलं आहे. उंदराच्या औषधाने जिवंत माणसाचा घात केला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, याप्रकरणी धारावी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कर्नाटकातही महिलेचा मृत्यू

उंदाराच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झालेली धारावीतील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी एका 57 वर्षीय महिलेचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. भल्या पहाटे उठून नजरचुकीने उंदराच्या औषधाने दात घासल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही घटना नोव्हेंबर 2019 मध्ये घडली होती.

संबंधित बातम्या  

VIDEO : मला कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन, अब्दुल सत्तारांनी ग्रामसेवकाला झापलं!

राज ठाकरेंची महत्त्वाची सूचना मान्य, ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश