फेसबुकवर मुलीच्या नावाने अकाऊंट बनवतो, तरुणांशी मैत्री, मग नोकरीच्या बहाण्याने बोलावून मोबाईल पळवतो

| Updated on: Nov 27, 2021 | 11:36 PM

हे पळवलेले सर्व मोबाईल आरोपी ओएलएक्सवरून विकायचा, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या चेहऱ्यावरून एका सुंदर मुलीचा बुरखा हटवला आहे.

फेसबुकवर मुलीच्या नावाने अकाऊंट बनवतो, तरुणांशी मैत्री, मग नोकरीच्या बहाण्याने बोलावून मोबाईल पळवतो
फेसबुकवर मुलीच्या नावाने अकाऊंट बनवतो, तरुणांशी मैत्री, मग नोकरीच्या बहाण्याने बोलावून मोबाईल पळवतो
Follow us on

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतीलच, पण मुंबई पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे ज्याचे किस्से ऐकून तुम्ही हैराण व्हाल. मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळलेला हा चोरटा आधी मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट बनवून तरुणांशी मैत्री करायचा. मग त्यांना नोकरीच्या बहाण्याने भेटायला बोलवून त्यांचा मोबाईल घेऊन पसार व्हायचा.

सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलवायचा

हा चोरटा मुलींच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवायचा. डिपीला सुंदर मुलीचा फोटो ठेवायचा. त्यानंतर त्या अकाऊंटवरुन तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. तरुणांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर काही दिवस त्यांच्यासोबत प्रेमाने बोलायचा आणि आपल्या जाळ्यात ओढायचा. एकदा तरुण जाळ्यात अडकला की त्याला मुंबईतल्या कोणत्याही मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फोन करायचा. तरुण दवाखान्यात गेल्यावर तो स्वतः हजर व्हायचा आणि नोकरीसाठी फॉर्म भरण्याच्या नावाखाली त्या तरुणांचा मोबाईल हिसकावून घेत काही काळ मोबाईलमध्ये फॉर्म भरणाऱ्या तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवून त्यांचा फोन घेऊन फरार व्हायचा.

कांदिवली पोलिसांकडून आरोपीला अटक

सध्या कांदिवली पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. तपासा दरम्यान आरोपीने एका तरुणाला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नोकरीच्या नावाखाली बोलावून फॉर्म भरण्याचा बहाणा करुन त्याचा मोबाईल घेऊन पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्याचे थेट छायाचित्र रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, हा आरोपी केवळ कांदिवली शताब्दी रुग्णालयातच नव्हे तर मुंबईतील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कूपर रुग्णालयातही मुलांना नोकरीच्या नावाखाली बोलावून फॉर्म भरण्याचे नाव घेऊन त्यांचा मोबाईल घेऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

पळवलेले सर्व मोबाईल ओएलएक्सवर विकायचा

हे पळवलेले सर्व मोबाईल आरोपी ओएलएक्सवरून विकायचा, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या चेहऱ्यावरून एका सुंदर मुलीचा बुरखा हटवला आहे. हमीद सलीम शेख(28) असे अटक आरोपीचे नाव आहे. रुमेशा सिद्दीकी यांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करण्यात आला होता. आरोपींवर यापूर्वीच अशा प्रकारचे 4 गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील इतर कोणत्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आणखी किती मुलांना लुटले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. (Thief arrested for cheating youth from fake Facebook account)

इतर बातम्या

नवी मुंबई दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक, तीन फरार आरोपींचा शोध सुरु

VIDEO | उल्हासनगरात दारूसाठी पैसे मागत गावगुंडांचा हैदोस; पोलिसांनी त्याच परिसरातून काढली गावगुंडांची ‘वरात’