नकळत रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि घात झाला, भरल्या घरात संकट ओढावलं, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 10, 2021 | 12:33 AM

पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीच्या विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकळत रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि घात झाला, भरल्या घरात संकट ओढावलं, नेमकं काय घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : आपल्यासोबत कधी काय घडले याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे आपल्या हातात आहे तो क्षण आपण जगून घ्यायला हवा. याशिवाय आपण एक जबाबदार नागरीक म्हणून वागलं पाहिजे. आपल्या हातून चुकून जरी बेजाबदारासारखं वागलं गेलं तर त्याने आपलंच नुकसान होऊ शकतं. अशीच काहिशी घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात घडली आहे. पतीच्या एका चुकीमुळे एका महिलेचा जीव धोक्यात गेला. याशिवाय हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:ख ओढावलं. पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीच्या विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथच्या चिखलोली पाड्याजवळील पवार सेक्शन भागात उद्योजक अविनाश पवार राहतात. पवार यांनी त्यांचं परवानाधारक रिव्हॉल्वर घराच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलं होतं. दरम्यान अविनाश यांच्या पत्नी अनिता पवार या ड्रॉव्हरमधून मेडिकलची फाईल काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्याकडून हे रिव्हॉल्वर चुकून खाली पडलं. हे रिव्हॉल्वर भरलेलं असल्यानं ते खाली पडताच त्यातून एक गोळी सुटली आणि ती थेट अनिता यांच्या पायात घुसली.

महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

संबंधित घटना घडताच घरातील सदस्यांनी धाव घेत अनिता यांना तात्काळ डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनिता यांचे पती परवाना धारक अविनाश पवार यांच्याविरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिव्हॉल्वरची योग्य काळजी न घेतल्यानं हे रिव्हॉल्वर पोलिसांनी जप्त केलंय.

नेमकं सत्य काय, हे मात्र अनुत्तरीतच

दरम्यान, या घटनेबाबत आधी सासऱ्याची दरवाजाला लटकवलेली पँट धुण्यासाठी घेत असताना त्या पँटला लावलेलं रिव्हॉल्वर खाली पडलं आणि त्यातून गोळी सुटली, असा देखील बनाव रचण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे रिव्हॉल्वर जखमी महिलेच्या सासऱ्याचं नसून पतीचं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नेमकं सत्य काय, हे मात्र अनुत्तरीतच आहे. दरम्यान, या सगळ्याबाबत पवार कुटुंबियांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा :

पुण्याहून रांचीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा, पोलिसांसह आख्खी यंत्रणा कामाला लागली आणि….

मोठी बातमी ! लखीमपूर हिंसाचार प्रकरणी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला बेड्या