AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना

गतिमंद महिला एक्सप्रेसखाली झोपल्याची धक्कादायक घटना बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. सुदैवानं या घटनेत संबंधित महिलेला काहीही इजा झालेली नाही.

गतिमंद महिला रेल्वे रुळावर झोपली, एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही ती बचावली, बदलापूर रेल्वे स्टेशनमधील थरारक घटना
बदलापूर रेल्वे स्टेशन
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 12:00 AM
Share

ठाणे: गतिमंद महिला एक्सप्रेसखाली झोपल्याची धक्कादायक घटना बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. सुदैवानं या घटनेत संबंधित महिलेला काहीही इजा झालेली नाही. आश्चर्यकारकरित्या संबंधित महिला बचावली आहे. (Woman with mental stress trying to commit suicide sleep on railway track at Badlapur station but safe after came under express train)

कधी घडला हा प्रकार?

गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकातून उद्यान एक्स्प्रेस धडधडत वांगणीच्या दिशेनं गेली. मात्र, रेल्वे स्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर लोको पायलटने करकचून ब्रेक दाबले. एक महिला रेल्वे रुळावर झोपली असून तिच्या अंगावरून एक्स्प्रेस गेल्याची माहिती लोको पायलटने स्टेशन मास्तरांना दिली.

रेल्वे अंगावरून जाऊनही महिला सुखरुप

स्टेशन मास्तरांना हा प्रकार कळताचरेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्या महिलेला साधा ओरखडाही आला नसल्याचं स्पष्ट झालं. संबंधित 35 वर्षीय महिला ही गतिमंद असून मानसिक तणावातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या महिलेचा पत्ता शोधून तिच्या आईला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. आता महिलेला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मात्र काही काळ घबराट पसरली होती, अशी माहिती जीआरपी कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी दिली.

एप्रिल महिन्यात मयूर शेळकेंच्या धाडसानं चिमुकल्याला जीवदान

मध्य रेल्वेचा पाँईटंमन मयुर शेळके मुबंई पुणे मार्गावरील वागंणी स्टेशनवर कर्तव्य बजावत असतात. 17 एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फ्लँटफाँर्मवर चालत असताना तीच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने एक्सप्रेसही येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 7 सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पाँईटमनने लहान मुलाचा जीव वाचवला होता. मयुर शेळके च्या पराक्रमाची चर्चा पूर्ण देशभरात सुरु झाली. त्यानतंर मयुर शेळकेचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या:

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या देवदूताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मयुर शेळकेला ठाकरेंचा फोन

(Woman with mental stress trying to commit suicide sleep on railway track at Badlapur station but safe after came under express train)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.