मंदिरं-विमानतळांवर बॉम्बस्फोट करु, योगी-शाहांच्या जीवालाही धोका, CRPF च्या मुंबई मुख्यालयाला धमकीचा ईमेल

| Updated on: Apr 06, 2021 | 10:58 AM

भारतात लष्कर-ए-तोयबाचे 11 पेक्षा जास्त दहशतवादी आणि आत्मघाती हल्लेखोर सक्रिय असल्याचेही ईमेलमध्ये नमूद केले आहे (Mumbai CRPF threat email )

मंदिरं-विमानतळांवर बॉम्बस्फोट करु, योगी-शाहांच्या जीवालाही धोका, CRPF च्या मुंबई मुख्यालयाला धमकीचा ईमेल
अमित शाह, योगी आदित्यनाथ
Follow us on

मुंबई : सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. मेलमध्ये सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आणि विमानतळांवर अनेक बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवालाही धोका असल्याचं मेलमध्ये म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (Mumbai CRPF Head office threat email claims Serial blast at temple airport threat to Amit Shah Yogi Adityanath)

सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयाला 4 ते 5 दिवसांपूर्वी ईमेल आल्याची माहिती आहे. सीआरपीएफच्या धोका व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून हे मेल तपास यंत्रणा एनआयएसह इतर गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले आहेत. हा मेल मिळाल्यानंतर तपास यंत्रणा ईमेलच्या स्त्रोत आणि षडयंत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहेत

“11 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय”

भारतात लष्कर-ए-तोयबाचे 11 पेक्षा जास्त दहशतवादी आणि आत्मघाती हल्लेखोर सक्रिय असल्याचेही ईमेलमध्ये नमूद केले आहे. तीन राज्यात 200 किलो हायग्रेड आरडीएक्स असल्याचे मेलमध्ये उल्लेख आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवालाही धोका असल्याचं मेलमध्ये म्हटले आहे.

ईमेलच्या शेवटी इशारा देणारा संदेश लिहिण्यात आला आहे

‘आम्ही अज्ञात आहोत
आम्ही एक आर्मी आहोत
आम्ही माफ करत नाही
आम्ही विसरत नाही
आमची वाट पाहा

(Mumbai CRPF Head office threat email claims Serial blast at temple airport threat to Amit Shah Yogi Adityanath)

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनआयए कंट्रोल रुमवरही असाच फोन आला होता. कॉलरने पाकिस्तानच्या कराची शहरातून कॉल केल्याचा दावा केला होता. मुंबई बंदर आणि पोलिस आस्थापनांवर जैशच्या हल्ल्याच्या नियोजनाची माहिती दिली होती. या प्रकरणाची चौकशीही सध्या सुरू आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण ताजे

मुंबईत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वीच स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. गाडीत धमकीचे पत्रही सापडले होते. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप पूर्ण उलगडा झालेला नाही.

संबंधित बातम्या :

पंजाबमध्ये 24 तासांत चार विमानांत बॉम्ब ठेवण्याची धमकी; आरोपी म्हणे, वाचवू शकत असलात तर वाचवा

(Mumbai CRPF Head office threat email claims Serial blast at temple airport threat to Amit Shah Yogi Adityanath)